Join us  

अनिल कपूर 'या' आजाराने ग्रस्त, उपचारासाठी जाणार जर्मनीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 7:44 PM

गेल्या २ वर्षापासून अनिल कपूर या आजाराशी लढा देत आहेत.

ठळक मुद्देअनिल कपूर गेल्या २ वर्षांपासून ‘कॅलशिफिकेशन ऑफ शोल्डर’ या आजाराने ग्रस्त

बॉलिवूडचा अभिनेता अनिल कपूर सर्वात फिट कलाकारांपैकी एक मानले जातात. आजही त्याच्या चेहऱ्यावर चमक असून त्यांनी स्वतःला खूप चांगले तंदरूस्त ठेवले आहे. खुद्द सोनम कपूरने देखील पप्पा आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक असल्याचे सांगितले होते. आता ते आजाराने ग्रस्त असून ते उपचारासाठी जर्मनीला रवाना होणार आहे. 

अनिल कपूर गेल्या २ वर्षांपासून ‘कॅलशिफिकेशन ऑफ शोल्डर’ या आजाराने ग्रस्त असून एप्रिलमध्ये ते जर्मनीला उपचारासाठी जाणार आहेत.अनिल यांच्या उजव्या खांद्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना सतत खांदे दुखीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या आजारावर लवकरात लवकर उपचार घेणे गरजेचे आहे. ‘सतत चित्रपटाचे शुटींग, साहसदृशांसाठी करावी लागणार मेहनत याचा परिणाम शरिरावर झाला असून त्यामुळेच खांदेदुखीची ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र या स्पर्धेच्या युगात जर स्वत:ला टिकवून ठेवायचे असेल तर हे सारे करावेच लागते’, असे अनिल कपूर म्हणाले.

अनिल कपूर सध्या त्यांच्या आगामी ‘टोटल धमाल’ या चित्रपटामध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त त्यांचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांच्यासोबत पहिल्यांदाच सोनम कपूर स्क्रीन शेअर करणार आहे. त्या दोघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूर