Join us  

१९ वर्षांनंतर बनणार अनिल कपूरच्या ‘या’ चित्रपटाचा सीक्वल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:24 PM

येत्या २२ तारखेला अजय देवगण -अनिल कपूरचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. सध्या अनिल आपल्या अख्ख्या स्टारकास्टसह या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण याचदरम्यान अनिल कपूरच्या १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा जोरात आहे.

ठळक मुद्दे‘टोटल धमाल’नंतर अनिल कपूर लवकरच एका चित्रपटात निगेटीव्ह भूमिका साकारताना दिसणार आहेत. आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील

येत्या २२ तारखेला अजय देवगण -अनिल कपूरचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. सध्या अनिल आपल्या अख्ख्या स्टारकास्टसह या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण याचदरम्यान अनिल कपूरच्या १९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा जोरात आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘नायक - द रिअल हिरो’. या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु झाल्याचे कळतेय. अनिल कपूरला जेव्हा याबद्दल छेडले गेले, तेव्हा तोही आनंदित झाला. ‘नायक’चा सीक्वल हा एक चांगला विचार आहे, असे तो म्हणाला.

सन २००१ मध्ये अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘नायक’ प्रदर्शित झाला आणि सुपरडुपर हिट झाला. एक सामान्य तरूण एक  दिवसाचा मुख्यमंत्री बनतो आणि या एका दिवसांत अख्ख्या राज्याचे चित्र बदलतो, असे या चित्रपटाचे कथानक होते. राणी मुखर्जी आणि दिवंगत अमरिश पुरी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक विसरलेले नाहीत. अशात या चित्रपटाचा सीक्वल येणार म्हटल्यावर सगळेच उत्सुक असणार आहेत. विशेषत: या सीक्वलमध्ये कुणाची वर्णी लागते, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

‘टोटल धमाल’नंतर अनिल कपूर लवकरच एका चित्रपटात निगेटीव्ह भूमिका साकारताना दिसणार आहेत. आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. येत्या मार्चपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल. मोहित सूरी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

टॅग्स :अनिल कपूरअमरिश पुरीराणी मुखर्जी