Join us  

बाबो...! अनिल कपूरने पत्नी सुनीता कपूरला दिलं इतकं महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 5:13 PM

बर्थ डे गिफ्ट मिळाल्यानंतर सुनीता कपूर खूप खूश झाल्या आहेत. 

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूjने पत्नी सुनीता कपूर यांना एक नवीन आणि सुंदर गिफ्ट दिले आहे. आपल्या पत्नीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून अनिलने एक नवीन मर्सिडीज कार भेट म्हणून दिली.  अनिलच्या घराबाहेर पापाराजीला एक नवीन कार दिसली.  ही एक काळा रंगाची मर्सिडीज बेंझ जीएलएस आहे, ज्याची किंमत सध्या जवळजवळ एक कोटी रुपये आहे.

 बर्थ डे गिफ्ट मिळाल्यानंतर सुनीता कपूर खूप खूश आहेत.  गिफ्टमध्ये मिळालेल्या मर्सिडीज बेंझची त्यांनी पूजादेखील केली.  घराबाहेर उभी असलेल्या या कारवर फुलांचा हार घातलेला. अनिल कपूरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सुनीताच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि सुनीता यांच्यासोबतचे  अनेक फोटो शेअर केले.

अनिल कपूर व सुनीता यांनी लग्नाआधी 10 वर्षे एकमेकांना डेट केले आणि एकदिवस अचानक लग्न केले. एका मुलाखती दरम्यान अनिलने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले होते की, माझ्या एका मित्राने सुनीताला माझा नंबर दिला होता. जेणेकरून ती मला प्रँक कॉल करू शकेल. एकदा आम्ही बोललो आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्यावर भाळलो. काही आठवड्यानंतर आम्ही एका पार्टीत भेटलो.

टॅग्स :अनिल कपूर