Join us  

दहशतवादी हल्ल्याबद्दल ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 5:51 PM

प्रत्येक जण आज शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी कठोर अ‍ॅक्शनची मागणी करत आहेत. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटला असून बॉलिवूड सेलेब्सनेही दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध करत संताप व्यक्त केला आहे.  

-रवींद्र मोरे 

गुरुवारी जम्मू काश्मिरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. प्रत्येक जण आज शहीद जवानांचा बदला घेण्यासाठी कठोर अ‍ॅक्शनची मागणी करत आहेत. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटला असून बॉलिवूड सेलेब्सनेही दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा तिव्र शब्दात निषेध करत संताप व्यक्त केला आहे.  

* सलमान खान खान अ‍ॅक्टर्सने या हल्ल्यााबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे सर्जिकल स्ट्राइकच्या खऱ्या घटनेवर आधारित बनलेल्या ‘उरी’ चित्रपटामध्ये आर्मी जवानाची भूमिका साकारणारा विक्की कौशलनेही या हल्ल्याची तिव्र शब्दात निंदा केली आहे. सलमानने लिहिले आहे की, ‘माझे मन आपल्या आवडत्या देशाचे जवान आणि त्यांच्या परिवारासाठी रडत आहे, ज्यांनी आपल्या सर्वांच्या परिवाराच्या रक्षणासाठी स्वत:च्या जीवाचे बलिदान दिले.’ 

* आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानदेखील या हल्ल्याने दु:खी आहे. त्याने ट्वीटद्वारे लिहिले आहे की, ‘पुलवामा मध्ये आपल्या लाडक्या सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत ऐकून मी स्तब्ध झालो. ही खूपच दु:खदायक घटना आहे. त्या जवानांच्या परिवाराप्रति माझ्या संवेदना आहेत, ज्यांनी आपल्या मुलाला गमविले आहे.’ 

* विक्की कौशलउरी चित्रपटात जवानाची भूमिका साकारणारा विक्की कौशलनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याने लिहिले आहे की, ‘या दहशतवादी हल्ल्याबाबत ऐकून मला धक्काच बसला, जवान शहीद झाल्याने खूपच दु:ख झाले. माझे मन सीआरपीएफचे ते शूर शहीद जवान आणि त्यांच्या परिवारासाठी भरुन येत आहे. जे जवान जखमी झाले आहेत ते लवकर बरे होवोत.’ 

* मोहित रैनाउरी फेम मोहित रैनानेदेखील या हल्ल्याला भ्याड हल्ला म्हटले आहे. त्याने लिहिले आहे की, ‘भारताच्या शूर जवानांना श्रद्धांजली. कधी दहशतवाद्यांना कळेल की, अशी कोणती स्वतंत्रता आहे? हा ठराविक मर्यादेपर्यंत आणि लोभी लोकांचा खेळला जाणारा खेळ आहे आणि हे स्पष्ट आयुष्याचे नुकसान आहे.’ 

* रितेश देशमुखबॉलिवूड अ‍ॅक्टर रितेश देशमुखने या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत ट्वीटद्वारे लिहिले आहे की, ‘पुलवामाहून खरंच खूपच दु:खदायक बातमी येत आहे. त्या शहीदांच्या परिवाराला माझी सांत्वना, ज्यांनी आपल्या शूरविराला गमविले आहे. त्या भित्र्यांनी पुन्हा एखदा निंदनीय कृत्य केले आहे.’ 

* अनुपम खेर, मधुर भंडारकर, मधुर भंडारकर, फरहान अख्तर, प्रियंका चोप्रा, प्रीति जिंटा, रणवीर सिंह, करण जौहर, ऋषि कपूर, जावेद अख्तर, अनुष्का शर्मा, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, सुनील ग्रोवर, मनोज बाजपेयी, तापसी पन्नू, वरुण धवन, स्वरा भास्कर यांनीही आपआपल्या ट्वीटर अकाउंटद्वारे या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे.  

टॅग्स :रितेश देशमुखपुलवामा दहशतवादी हल्लादहशतवादी हल्लासलमान खानविकी कौशल