Join us

बेबो झाली करणवर नाराज

By admin | Updated: September 29, 2016 01:44 IST

करिना कपूर आणि करण जोहर इंडस्ट्रीमध्ये बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखले जातात. मात्र सध्या दोघांच्या मैत्रीला तडा गेला असल्याचे बोलले जात आहे. याचे कारण की, ‘ऐ दिल है मुश्किल’

करिना कपूर आणि करण जोहर इंडस्ट्रीमध्ये बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखले जातात. मात्र सध्या दोघांच्या मैत्रीला तडा गेला असल्याचे बोलले जात आहे. याचे कारण की, ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातून करणने सैफचा रोल काढून टाकला. त्याचे झाले असे की, करणने सैफला या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका आॅफर केली होती. पण त्याचा जिगरी फ्रेंड शाहरुखने कॅमिओ करण्यास होकार दिल्यामुळे करणने सैफचा पत्ता कट केला. यामुळे करिना त्याच्यावर खूप नाराज आहे. सैफच्या बुडत्या करिअरला यामुळे थोडाफार आधार मिळाला असता अशी तिची अपेक्षा असावी. तिकडे अजय देवगणमुळे करण आणि काजोलची मैत्रीसुद्धा आता तुटल्यात जमा आहे. एक-एक करत त्याचे जवळचे मित्र दूर जात आहेत. त्यामुळे करण आता आपली मैत्री टिकवण्यासाठी काय करतो हे पाहणे रंजक ठरेल. सैफने करणच्या ‘कल हो ना हो’ आणि ‘कुर्बान’ या दोन सिनेमांत काम केलेले आहे.