-आणि तिने एक अख्खा दिवस प्रभासला आपल्या पाठीवर मिरवले...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 12:12 IST
आपला आवडता अभिनेता वा अभिनेत्रींवर जीव ओवाळून टाकणारेही काही चाहते आहेत. आवडत्या स्टारवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक चाहते नाही ...
-आणि तिने एक अख्खा दिवस प्रभासला आपल्या पाठीवर मिरवले...!
आपला आवडता अभिनेता वा अभिनेत्रींवर जीव ओवाळून टाकणारेही काही चाहते आहेत. आवडत्या स्टारवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक चाहते नाही नाही त्या क्लृप्त्या करताना दिसतात. हैदराबादेतील एका लेडी फॅननेही असेच काही केलेय. ही तरूणी कुणाची चाहती आहे तर ‘बाहुबली’ प्रभासची. मग काय, प्रभासवरचे प्रेम व्यक्त तर करायलाच हवे ना. या पठ्ठीने यासाठी काय करावे? तिने प्रभासला अख्खा दिवस आपल्या उघड्या पाठीवर मिरवले. होय, चक्क पाठीवर मिरवले. आता हे कसे शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे खरे आहे. या क्रेझी लेडी फॅनने प्रभासच्या ‘बाहुबली’ लूकचे पेन्टिंग आपल्या उघड्या पाठीवर काढून घेतले आणि दिवसभर मोठ्या अभिमानाने ते मिरवले. गत २३ आॅक्टोबरला प्रभासचा वाढदिवस होता. हेच निमित्त साधून त्याच्या या के्रझी लेडी फॅनने प्रभासचे पेन्टिंग आपल्या पाठीवर काढून घेतले. ALSO READ: ‘बाहुबली’ प्रभासने ‘देवसेना’ अनुष्का शेट्टी दिली वाढदिवसाची अलिशान भेट! काय, ते वाचाच!!आपल्या पाठीवर प्रभासचे पेन्टिंग काढणारी ही क्रेझी लेडी फॅन कोण, कुठली, हे अद्याप समोर आलेले नाहीत. पण या पेन्टिंगचे फोटो मात्र वेगाने व्हायरल होत आहेत. प्रभासने हे फोटो पाहिलेत की नाही, ते तूर्तास सांगता येणार नाही. पण त्याने हे फोटो पाहिलेच तर या चाहतीचे आभार मानायला त्याच्याकडे शब्द सापडणार नाहीत, हे नक्की.‘बाहुबली’नंतर प्रभासच्या चाहत्यांची संख्या प्रचंड वाढलीय. आता चाहत्यांना प्रभासच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे.सध्या प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. हैदराबादेत या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. यात प्रभासच्या अपोझिट दिसणार आहे ती श्रद्धा कपूर. या चित्रपटात प्रभास दमदार अॅक्शन करताना दिसणर आहे. विशेष म्हणजे या अॅक्शन सीन्ससाठी बॉडी डबल घेण्यास प्रभासने नकार दिला आहे. त्यामुळे प्रभास स्वत: सगळे स्टंट सीन्स करतोय.