‘अनारकली आॅफ आरा’चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 20:03 IST
‘अनारकली आॅफ आरा’ ही कथा आहे एका गावागावांमध्ये जाऊन नाचगाणी करणाºया तरुणीची. ती कशाप्रकारे प्रतिष्ठीतांच्या नाकी नऊ आणते असे यातून दाखविण्यात आले आहे.
‘अनारकली आॅफ आरा’चा ट्रेलर रिलीज
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी अनारकली आॅफ आरा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चा होत आहे. या चित्रपटात स्वरा एका गायिकेच्या रुपात दिसणार असून तिचा लूक अंग्री यंग वूमनचा असल्याचे सांगण्यात येत होते. स्वरा भास्करच्या आगामी ह्यअनारकली आॅफ आराह्ण या चित्रपटात ती गायिकेच्या रूपात दिसणार आहे. हा चित्रपट म्युझिकल ड्रामा असल्याचे सांगण्यात येते. चित्रपटात स्वरा बिहारमधील आरा या गावातील गायिका आहे. ती स्थानिक कार्यक्रमात गाते. एका घटनेमुळे तिचे जीवन बदलते, भीती आणि विस्थापन हे तिच्या जीवनाचा भाग होतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. ‘अनारकली आॅफ आरा’ ही कथा आहे एका गावागावांमध्ये जाऊन नाचगाणी करणाºया तरुणीची. ती कशाप्रकारे प्रतिष्ठीतांच्या नाकी नऊ आणते असे यातून दाखविण्यात आले आहे. यासोबतच देशातील अनेक कानाकोप-यात नाचगाणं करून पोट भरणा-या महिलांची काय स्थिती आहे, यावर हा सिनेमा आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वरा भास्करसह या चित्रपटात संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी, संदीप कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन अविनाश दास यांनी केलं आहे. संदीप कपूर आणि प्रिया कपूर यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटाविषयी माहिती देताना दिग्दर्शक अविनाश दास याने ‘अनारकली आपल्या गाण्याच्या माध्यमातून लोकांच्या मनात दडलेल्या भावनांचे विश्व उलगडते, तिला ऐकणारे तिच्यावर प्रेम करू लागतात, या संगीताच्या यात्रेत तिच्यावरील लोकांचे प्रेम अधिक गडद होऊ लागते. तिच्या प्रेमाचा भूतकाळ आहे, सेक्सबद्दल ती पारंपारिक विचार करणारी नाही. ऐवढे असूनही तिला स्वत:चा आत्मसन्मान आहे याची जाणीव ती करून देत असते, असे सांगितले होते.