Join us  

बोल्डनेसच्या नादात उप्स मोमेंटची शिकार झाली अनन्या पांडे, उर्फी जावेदशी होतेय तुलना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 1:29 PM

अनन्या पांडे  ‘लाइगर’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात साउथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाही झळकणार आहे. नुकताच मुंबईत सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.  रणवीर सिंह, करण जोहर आणि सिनेमाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सगळेच उपस्थित होते.

एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमेऱ्याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी स्टायलिश लूकमुळे एखाद्या लाजिरवाण्या घटनेचा सामनाही त्यांना करावा लागतो. ही घटना घडताना कुणी पाहिलं तर नसेल असं आपल्याला वाटत राहतं. जर कुणी बघितलंच असेल तर आपलं चारचौघात हसू होऊ नये अशीही अनेकांची इच्छा असते. असाच काहीसा लाजिरवाणा प्रकार अभिनेत्री अनन्या पांडेसोबत घडला आहे. 

त्याचं झालं असं की अनन्या पांडे  ‘लाइगर’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात साउथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाही झळकणार आहे. नुकताच मुंबईत सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.  रणवीर सिंह, करण जोहर आणि सिनेमाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ सगळेच उपस्थित होते. या लॉन्चवेळी  सगळ्यांच्या नजरा मात्र  फक्त अनन्या पांडेवरच खिळल्या होत्या. अतिशय स्टायलिश लूकमध्ये अनन्याने हजेरी लावली होती. यावेळी तिने ब्लॅक कलरच्या हाय थाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. ती स्टाइलमध्ये पोजही देत होती.या ड्रेसमध्ये अनन्या स्टायलिश दिसत असली तरी हाच डिझायनर ड्रेस तिच्यासाठी डोकेदुखी ठरला. याच ड्रेसमुळे ती उप्स मोमेंटची बळी पडली. 

विशेष म्हणजे इव्हेंटसुरु होण्याआधीचा अनन्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती ड्रेस सावरताना दिसत आहे. इतकंच काय तर ती नर्व्हसही दिसते. अनन्याचा असा लूक पाहून नेटीझन्स मात्र तिची तुलना उर्फी जावेदसोबत करताना दिसत आहेत. तिचा लूक पाहून अनन्याची फॅशन डिझायनर उर्फी जावेद आहे का ? तर एका युजरने उर्फीची छोटी बहिण असल्याचे अनन्याला म्हटले आहे. अशा प्रकारे अनेक कमेंट करत तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत.   

टॅग्स :अनन्या पांडेविजय देवरकोंडा