Join us  

अनन्या पांडे बॉलिवूडमधील 'या' सुंदर अभिनेत्रीला मानते आपलं प्रेरणास्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:41 PM

अनन्या पांडे  'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

अनन्या पांडे  'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सिनेमा जरी बॉक्स ऑफिसवर हिट झाला नसला तरी या सिनेमातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. 

आजतकच्या रिपोर्टनुसार अनन्या पांडेला आलिया भट खूप आवडते. काही महिन्यांपूर्वी अनन्या दिलेल्या मुलाखती सांगितले की, आलियाच्या करिअरग्राफने तिला खूप इंस्पायर केले आहे. सुरुवातीच्या काळात आलियाने कधीच स्वत:ला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न केला नाही तिची हीच गोष्ट अनन्याला खूप आवडते.   

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर,  दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.अनन्या पांडेच्या साऊथच्या चित्रपटाचे नाव फायटर असून यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.हा चित्रपट हिंदी व तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवायदेखील आणखीन काही भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, चार्मी कौर, अपूर्व मेहता करत आहेत.

टॅग्स :अनन्या पांडे