Join us  

“हा ५७ वर्षांचा अभिनेता आहे?”, ‘जवान’चं गाणं पाहून भारावले आनंद महिंद्रा, शाहरुख उत्तर देत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 5:18 PM

शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातील 'झिंदा बंदा' हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले. या गाण्यातील शाहरुखचा अंदाज पाहून आनंद महिंद्राही भारावून गेले आहेत.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘झिंदा बंदा’ हे गाणं प्रदर्शित झालं. ‘जवान’ चित्रपटातील या गाण्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यातील शाहरुखचा अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. शाहरुखच्या या गाण्याची उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही भुरळ पडली आहे.

‘जवान’ चित्रपटातील शाहरुखचं गाणं पाहून आनंद महिंद्रा भारावले आहेत. त्यांनी या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत शाहरुख खानसाठी खास ट्वीट केलं आहे. “हा ५७ वर्षांचा अभिनेता आहे? त्याची वय वाढण्याची प्रक्रिया गुरुत्वाकर्षण शक्तीला विरोध करते. तो कित्येक व्यक्तींपेक्षा दहा पटीने जिवंत आहे. #zindabanda असावा तर असा” असं म्हणत आनंद महिंद्रा यांनी शाहरुखचं कौतुक केलं होतं. त्याच्या या ट्वीटला किंग खानने रिप्लाय दिला आहे.

“मी माझ्या आईसाठी अंतवस्त्र खरेदी करतो”, करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला...

“आयुष्य खूप छोटं आणि वेगवान आहे. त्याच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. हसा, रडा किंवा उंच भरारी घ्या...काही क्षण एन्जॉय करण्याची स्वप्न बघा,” असा रिप्लाय शाहरुखने आनंद महिंद्रा यांना दिला आहे.

जेव्हा रुग्णालयात दाखल होते रजनीकांत, श्रीदेवी यांनी थलायवासाठी केलेला ७ दिवसांचा उपवास, कारण...

दरम्यान, शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट येत्या ७ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली कुमारने याचं दिग्दर्शन केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओके गोडबोलेही शाहरुखबरोबर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानआनंद महिंद्राबॉलिवूड