Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ अली खानच्या आधी या अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती अमृता सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 15:53 IST

अमृताच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे.

ठळक मुद्दे‘बेताब या चित्रपटात अमृता सिंग आणि सनी देओल मुख्य भूमिकेत होते.. ‘बेताब’मधील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. त्याकाळात या ‘बेताब’ जोडीच्या अफेअरची चर्चाही चवीने चघळली गेली.

प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगचा आज वाढदिवस आहे. अमृताने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. अमृताने तिच्यापेक्षा वयाने १२ वर्षे लहान असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न केले होते. त्यांना सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं देखील आहेत. पण त्यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. सैफ अमृताच्या आयुष्यात येण्याआधी तिचे नाव सनी देओलसोबत जोडले जात होते.

‘बेताब या चित्रपटात अमृता सिंग आणि सनी देओल मुख्य भूमिकेत होते. ‘बेताब’मधील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. त्याकाळात या ‘बेताब’ जोडीच्या अफेअरची चर्चाही चवीने चघळली गेली. या चित्रपटादरम्यान सनी व अमृता एकमेकांच्या अतिशय जवळ आले होते, असे म्हणतात. अभिनेत्री अमृताचे सनीवर खूप प्रेम होते. पण सनी मात्र पूर्ण जगासमोर हे नाते मान्य करण्यास तयार नव्हता. तो या नात्याला खुल्यापणाने स्वीकारण्यास नव्हता. दुसरीकडे अमृताच्या आईला देखील हे नातं मान्य नव्हतं. याचदरम्यान अमृताने सनीची बाहेरून चौकशी करण्यास सुरुवात केली आणि सनीचे लंडनमध्ये राहणाऱ्या पूजा नावाच्या मुलीसोबत अफेअर असल्याचे तिला कळले. 

अर्थात अमृता सनीच्या प्रेमात इतकी वेडी होती. सुरुवातीला सनी आणि पूजाच्या नात्यावर ती विश्वास ठेवायला तयार नव्हती. सनी कामाच्या निमित्ताने नेहमी लंडनला जात असे. एवढेच अमृताला माहीत होते. पण पुढे सनी आणि पूजाचे केवळ अफेअर नाही तर दोघांचे लग्न झाले आहे, हे अमृताला कळले.  सनीने लग्नाची गोष्ट अख्ख्या जगापासून लपवून ठेवली होती. पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येतेच.  त्याचप्रमाणे सनीच्या लग्नाची बातमी पेपरमध्ये झळकली. पण तरीही सनी लग्न झाले ही गोष्ट मान्य करण्यास तयार नव्हता. अर्थात तोपर्यंत सनी आणि अमृता यांचे नाते संपुष्टात आले होते.

 

टॅग्स :अमृता सिंग