सैफ अली खानवर जाम भडकली पहिली पत्नी अमृता सिंह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 15:12 IST
काही दिवसांपूर्वी सैफ अली खान मुलगी सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल मोकळेपणाने बोलला होता. पण त्याचे असे मोकळेपणे ...
सैफ अली खानवर जाम भडकली पहिली पत्नी अमृता सिंह!
काही दिवसांपूर्वी सैफ अली खान मुलगी सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल मोकळेपणाने बोलला होता. पण त्याचे असे मोकळेपणे बोलणे, कदाचित सैफची एक्स वाईफ अमृता सिंह हिला जराही रूचलेले दिसत नाही. साराच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल सैफ असा काही बोलला की, अमृता जाम भडकली आणि तिने सैफला खरे-खोटे सुनावले. होय, साराने बॉलिवूडसारखे असुरक्षित क्षेत्र करिअर म्हणून निवडलेले पाहून सैफ अस्वस्थ आहे. एका मुलाखतीत सैफने साराच्या या निर्णयावर काहीशी काळजी व्यक्त केली होती. साराच्या बॉलिवूडमधील करिअर करण्याच्या निर्णयाने मी थोडाचा नव्हर्स आहे. बॉलिवूड हे कमालीचे असुरक्षित क्षेत्र आहे, याची मला काळजी आहे. मी या क्षेत्राला कमी लेखतो आहे, असे मात्र अजिबात नाही. पण या क्षेत्रात येणाºया प्रत्येकाने बॉलिवूडमधील असुरक्षितता सहन केली आहे. अथक परिश्रम करूनही येथे यशाची कुठलीही खात्री नाही. अशास्थितीत आपल्या या क्षेत्राची निवड करावी, हे वडील म्हणून माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. तिने शिक्षण बघता, ती चांगल्या क्षेत्रात करिअर घडवू शकली असती. न्यूयॉर्कमध्ये सेटल झाली असती. पण तरिही तिने बॉलिवूडची निवड केली. हे मला अस्वस्थ करणारे आहे. अर्थात मी तिच्या निर्णयाचा आदर करतो, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता. पण पोरीबद्दल असा काळजीचा सूर आवळणे सैफला महागात पडले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या या मुलाखतीनंतर अमृताने सैफला फोन करून बरेच काही सुनावले. सैफचे असे बोलणे अतिशय बेजबाबदारपणाचे असल्याचे अमृताने म्हणणे आहे. पुढच्या वर्षी साराचा पहिला डेब्यू सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वी साराने अभिषेक कपूरचा ‘केदारनाथ’ हा सिनेमा साईन केला. या सिनेमात सुशांत सिंह राजपूत हा सारा अली खानचा हिरो असणार आहे.