Join us

अमृता होतेय रत्नविशारद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:33 IST

'मैं हू ना', ' विवाह', ईश्क विश्क',' लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण केलेली अभिनेत्री अमृता ...

'मैं हू ना', ' विवाह', ईश्क विश्क',' लाईफ हो तो ऐसी' या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण केलेली अभिनेत्री अमृता राव बाबत सध्या दोन गोष्टी चर्चेत आहेत.एक म्हणजे अमृता निर्माता प्रकाश झा यांच्या 'सत्संग' चित्रपटात काम करत आहे, आणि दुसरे म्हणजे तिने आता रत्ने, दागिणे आदींचा अभ्यास सुरू केला आहे.आता तुम्ही विचार करत असणार की या मॅडम 'सत्संग' साठी रत्नांचा अभ्यास करत असतील, तर तुम्ही साफ चुकलात.अमृता लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार असून तिचा कार्यक्रम रत्ने, दागदागिने यांच्याशी संबंधित असेल. या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून अमृता दागिण्यांबाबत शक्य तितकी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.थोड्याच दिवसांत आपल्याला कळेलच की नेमका तिचा कसला अभ्यास सुरू आहे.