Join us  

बॉलिवूडच्या महागड्या ‘आयटम गर्ल’; एका आयटम नंबरसाठी घेतात इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 8:00 AM

वाचून व्हाल थक्क...

टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’ या सिनेमातील ‘डू यू लव्ह मी’ हे आयटम सॉन्ग सध्या इंटरनेटवर धूम करतेय. दिशा पाटनीने या आयटम सॉन्गवर धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे. दिशा पाटणीआधी अनेक अभिनेत्रींनी आयटम सॉन्ग केलेय. एका आयटम सॉन्गसाठी या अभिनेत्रींनी किती मानधन घेतले हे तुम्हाला ठाऊक आहे? चला तर जाणून घेऊ या...

कतरीना कैफ

हृतिक रोशन व संजय दत्त स्टारर ‘अग्निपथ’ या सिनेमात कतरीना कैफ आयटम सॉन्गवर थिरकताना दिसली होती. या आयटम सॉन्गसाठी कतरीनाने 3.5 कोटी रूपये मानधन घेतले होते.

प्रियंका चोप्रा

बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये नाव कमावणारी ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा ‘रामलीला’ या सिनेमातील ‘राम चाहे लीला’ या गाण्यावर थिरकताना दिसली होती. या चित्रपटात रणवीर सिंग व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. या एका गाण्यासाठी प्रियंकाने 6 कोटी रूपये घेतले होते.

सनी लिओनी

‘बेबी डॉल’ सनी लिओनीने अनेक आयटम सॉन्ग केलेत. ‘बेबी डॉल मैं सोने दी’ हे तिचे आयटम सॉन्ग प्रचंड लोकप्रिय झाले होते. ‘लैला’ हे तिचे आयटम सॉन्गही गाजले होते. या गाण्यासाठी सनीने प्रत्येकी 3 कोटी फी घेतली होती.

करिना कपूर

करिना कपूरने अनेक चित्रपटात आयटम सॉन्ग केले. ‘हलकट जवानी’ या आयटम सॉन्गसाठी तिने 5 कोटी रूपये घेतल्याचे समजते.

मलायका अरोरा

आयटम नंबर म्हटल्यावर मलायका अरोराला विसरणे शक्यच नाही. एका आयटम सॉन्गसाठी मलायका 1 कोटी रूपये घेते.

जॅकलिन फर्नांडिस

टायगर श्रॉफ व दिशा पाटनीच्या ‘बागी 2’ या सिनेमात जॅकलिन फर्नांडिस ‘एक दो तीन’ या रिमिक्स सॉन्गवर थिरकली होती. या गाण्यासाठी जॅकने 2 कोटी घेतले होते.

सोनाक्षी सिन्हा

अक्षय कुमारच्या ‘बॉस’ या सिनेमातील ‘पार्टी आॅल नाइट’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. हनी सिंगने गायलेल्या या गाण्यावर सोनाक्षीने स्पेशल परफॉर्मन्स दिला होता. या गाण्यासाठी सोनाने 5 कोटी चार्ज केले होते.

चित्रांगदा सिंह

अक्षय कुमाररच्या ‘जोकर’ या सिनेमातील ‘काफिराना’ या आयटम सॉन्गसाठी चित्रांगदाने 80 लाख रूपये घेतले होते.

टॅग्स :बॉलिवूडकरिना कपूरमलायका अरोराकतरिना कैफ