Join us  

कार अपघातातून थोडक्यात बचावले बॉलिवूडचे हे प्रसिद्ध कपल, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 12:18 PM

हरियाणा जवळ हा अपघात झाला.

प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्या बीएमडब्ल्यू कारचा हरियाणामधील पानीपत जवळ अपघात झाला. त्याची कार एका मारूती स्विफ्ट कारला धडकली. या अपघातातून ते व त्यांची पत्नी संध्या गोखले थोडक्यात बचावले. 

अमोल पालेकर व त्यांची पत्नी संध्या गोखले त्यांचे नाटक कसूरच्या प्रयोगासाठी दिल्लीतून रोडमार्गे चंदीगढला येत होते. या दुर्घटनेत त्यांच कारचे नुकसान झाले आहे. मात्र त्यांना व त्यांच्या पत्नीला कोणतीही दुखापत झाली नाही.

दुर्घटनेनंतर त्यांची दुसऱ्या कारमधील लोकांशी वाददेखील झाले. त्यानंतर पालेकर व त्यांची पत्नी दुसऱ्या कारने चंदीगढला पोहचले. या कारणामुळे त्यांचे नाटक उशीरा सुरू झाले.  

अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी तब्बल २५ वर्षांनंतर कसूर या हिंदी नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले आहे. अमोल पालेकर यांच्यासोबत या नाटकाचे लेखन व सहदिग्दर्शन संध्या गोखले यांनी केले आहे. या नाटकात अमोल पालेकर यांनी सेवानिवृत्त एसीपीची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :अमोल पालेकर