Join us

​‘अतुल्य भारत’वर अमिताभ यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 20:02 IST

‘पनामा पेपर्स’ प्रकरण सध्या चर्चेत आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेतच. ‘पनामा पेपर्स’मध्ये नाव आल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व ...

‘पनामा पेपर्स’ प्रकरण सध्या चर्चेत आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेतच. ‘पनामा पेपर्स’मध्ये नाव आल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व त्यांची स्रूषा एैश्वर्या रॉय बच्चन हेही चर्चेत आहे. याच प्रकरणाशी संबंधित नव्या घडामोडीनुसार, ‘पनामा पेपर्स’मध्ये नाव आल्यामुळे अमिताभ यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर करण्याचा करार लांबणीवर टाकण्याची खबर आहे. अमिताभ यांच्यासोबत हा करार याच महिन्यात केला जाणार होता. मात्र कर चुकविण्यासाठी विदेशांमधील कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याबद्दल त्यांचे नाव  ‘पनामा पेपर्स’मध्ये आले होते. अर्थात या कंपन्यांशी कुठलाही संबंध नसून नावाचा गैरवापर झाल्याचा अमिताभ यांचा दावा आहे. मात्र याप्रकरणी अमिताभ यांना क्लीनचीट मिळेपर्यंत त्यांना ‘अतुल्य भारत’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर अमिताभ यांनी एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी करून  खुलासा केला आहे. ‘अतुल्य भारत’बाबत मला मीडियाकडून विचारणा होत आहे. ‘अतुल्य भारत’चे अ‍ॅम्बिसीडर बनवण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती मीडियाने दिला आहे. मी याबाबत सांगू इच्छितो की, मी स्वत: मला ‘अतुल्य भारत’चा ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर करा, अशी औपचारिक मागणी मी केलेली नव्हती. त्याचमुळे ब्रॅण्ड अ‍ॅम्बिसीडर न केल्याने मला काहीही फरक पडत नाही. ‘पनामा पेपर्स’बाबतही मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे,असे अमिताभ यांनी आपल्या आॅफिशिअल स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.