Join us  

‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’च्या सेटवरून लिक झाला महानायक अमिताभ बच्चनचा लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 3:19 PM

पुढच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये ख्रिसमसनिमित्त रिलीज होणाºया मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बिग बजेट ...

पुढच्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये ख्रिसमसनिमित्त रिलीज होणाºया मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बिग बजेट ‘ठग्स आॅफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये आतापासून प्रचंड उत्सुकता लागून आहे. कारण या चित्रपटाशी संबंधित एका पाठोपाठ एक अपडेट समोर येऊ लागल्याने लोकांना या चित्रपटाविषयी विचार करणे भाग पाडले जात आहे. समीक्षकांमध्ये तर या चित्रपटाचे बॉक्स आॅफिस कलेक्शन किती असेल यावरून आतापासून आकडेमोड केली जात आहे. असो, आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित एक अपडेट सांगणार आहोत. होय, काही दिवसांनंतर या चित्रपटाच्या सेटवरून आमीर खानचा लूक समोर आला होता. आता महानायक अमिताभ बच्चन यांचा लूक समोर आला असून, त्यांच्या लूकने भल्याभल्यांची बोलती बंद केली आहे. महानायक अमिताभ बच्चनचा हा फोटो सेटवरून लिक झाला आहे. ज्यामध्ये बिग बी अतिशय दमदार आणि हटके भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. कपाळावर कपडा गुंडाळून आणि पाठीवर तलवार असलेला बिग बीचा हा लूक एखाद्या योद्ध्याप्रमाणे दिसत आहे. त्यांच्या नजरेतील दमदारपणा अंगावर शहारे आणणारा असून, चित्रपटात त्यांची भूमिका प्रेक्षकांना वेड लावेल यात शंका नाही. या चित्रपटात अमिताभबरोबर आमीर खान, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. विजय कृष्ण आचार्य यांच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनविल्या जात असलेल्या या चित्रपटाला यशराज फिल्म्स प्रोड्यूस करीत आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटात आमीर खान आणि महानायक अमिताभ बच्चन पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करीत आहे. या अगोदर हे दोघे एकदाही चित्रपटात झळकले नाहीत. नुकत्याच एका मुलाखतीत फातिमा सना शेखने म्हटले होते की, ‘अमिताभ सर एक लीजेंड आहेत. त्यांनी ‘दंगल’ बघितल्यानंतर मला एक पत्र लिहिले होते. त्यावेळी मी कधीही विचार केला नव्हता की, मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. मी स्वत:ला खूपच नशीबवान समजते की, ‘ठग्ज आॅफ हिन्दोस्तान’सारख्या चित्रपटात मला महानायकांबरोबर काम करायला मिळत आहे.