Join us  

लॉकडाऊनमध्ये मराठी कलाकरांसाठी देवदूत बनले अमिताभ बच्चन, अशी करतायेत मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:46 PM

कोरोना महामारीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका चित्रपटसृष्टीलाही प्रचंड प्रमाणात बसला आहे.

कोरोना महामारीतून निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका चित्रपटसृष्टीलाही प्रचंड प्रमाणात बसला आहे. अशा परिस्थितीत मदतीचे असंख्य हात पुढे सरसावले आहेत. असाच मदतीचा हात पुढे करत  बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला सहकार्य केले आहे.

एका मोठ्या सुपर मार्केटचे १५०० रुपयाचे ५०० कूपन्स अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे सुपूर्द केले आहेत. नुकतेच महामंडळाच्या ५०० सभासदांना या कूपन्सचे वाटप करण्यात आले. या कूपन्स अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. 

या मदतीबद्दल 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या उत्‍तर प्रदेशातील कामगारांना त्यांच्या घरी जाता यावे, यासाठी त्यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर, अलाहाबाद आणि वाराणसीसाठी 6 स्‍पेशल चार्टर्ड फ्लाइट्सची व्यवस्था केली होती. तसेच त्यांनी  माहीम दर्गाह ट्रस्ट आणि हाजी अली दर्गाह ट्रस्टच्या सोबतीने 10 बसेस हाजी अलीहून 29 मे रोजी रवाना केल्या होत्या. या बसेसने उत्तर प्रदेशातील लखनौ, अलाहाबाद, गोरखपूर आणि भदोही आदी जिल्ह्यांशी संबंधित जवळपास 250 मजूरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. या बसेसमध्ये मजुरांच्या खाण्यापिण्यासह मेडिकल किटचीही व्यवस्था करण्यात आली होती.

टॅग्स :अमिताभ बच्चन