Join us  

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा देव, अध्यात्मावर विश्वास आहे का? म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 4:02 PM

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. नुकतेच त्याने बहिण नव्या नवेली नंदा हिचा पॉडकास्टमध्ये मनमोकळेपणाने संवाद साधला. या पॉडकास्टमध्ये तो आई श्वेता नंदा आणि  आजी जया बच्चन यांच्यासोबत सहभागी झाला होता. यावेळी त्यांनं अध्यात्मावर भाष्य केलं. 

नव्या नवेली नंदाचा 'व्हॉट द हेल नव्या'या पॉडकास्टचा लेटेस्ट एपिसोड नुकताच रिलीज झाला. यामध्ये नव्यासोबत अगस्त्यनं मानसिक आरोग्य, देव आणि अध्यात्मावर भाष्य केलं. तो म्हणाला, मला असं वाटतं की सध्याची पीढी ही खूप जास्त चिंताग्रस्त झाली आहे. क्षणार्धात गोष्टी मिळवण्याची सवय झाली असून संयम आणि विश्वास गमावला आहे. आयुष्यात गोष्टी सुरळीत होतील यावरचा आमचा विश्वास नाहीसा झाला आहे. कारण आता गोष्टी निश्चितच असली पाहिजे अशी सवय झाली आहे. लोक माझ्यावर हसतील पण मी खूप धार्मिक आणि आध्यात्मिक झालोय. या गोष्टी माझ्यामध्ये नैसर्गिकरित्या आल्या आहेत'.

'द आर्चीज' सिनेमातून पदार्पण करताना तो चिंतेत होता. पण, धर्माकडे वळल्याने त्याला खूप मदत झाल्याचं त्यानं सांगितलं. तो म्हणाला, 'जेव्हा मी अभिनय करायला सुरुवात केली. माझा पहिला चित्रपट केला, तेव्हा मी लोकांना आवडेल का. त्यांना माझ काम आवडेल का ही चिंता मला सतावत होती. त्यावेळी मी माझं सर्वोत्तम प्रयत्न केले आणि सर्व गोष्टी देवावर सोडल्या.  ज्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. त्या गोष्टी तुम्ही तुमचा ज्याच्यावर विश्वासा आहे, मग ते देव असो किंवा ऊर्जा त्यावर सोडून द्यायला हव्यात. असं केल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळते'.

नव्याच्या या पॉडकॉस्टमध्ये जया बच्चन आणि श्वेता नंदा यांनीही फेमिनिझम विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी जया बच्चन यांनी पुरुषत्वाबाबतीत आपले विचार मांडले. तर अगस्त्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास 'द आर्चीज'नंतर लवकरच नव्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे. श्रीराम राघवनने एका चित्रपटात अरुण खेत्रपालच्या भूमिकेसाठी अगस्त्यला कास्ट केलं आहे. तर धर्मेंद्र त्याचे वडील एमएल खेत्रपाल ही भूमिका साकारणार आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूडयु ट्यूब