Join us  

‘मनमर्जियां’ पाहून अमिताभ बच्चन यांनी विकी-तापसीला दिली शाब्बासकी! अभिषेकला मात्र ठेवले ताटकळत!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 11:08 AM

‘मनमर्जियां’ पाहिल्यानंतर अभिषेकने पापा अमिताभ यांना प्रतिक्रिया विचारली़. पण, नंतर सांगतो, असे म्हणत अमिताभ यांनी काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. 

गत दोन वर्षांत ज्युनिअर बच्चन अभिषेक बच्चनला चाहत्यांनी प्रचंड मिस केले. पण आता दोन वर्षांनंतर अभिषेक पुनरागमन करतोय. ‘मनमर्जियां’ हा अभिषेकचा चित्रपट उद्या शुक्रवारी चित्रपटगृहांत झळत आहे. साहजिकचं अभिषेकच्या वापसीला घेऊन अनेक चाहते क्रेझी आहेत.  दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘हाऊसफुल3’मधील अभिनयासाठी अभिषेकला बरीच टीका सहन करावी लागली होती. समीक्षकांनी त्याच्या अभिनयावर परखड टीका केली होती. आता ‘मनमर्जियां’तील अभिषेकच्या अभिनयावर समीक्षक काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. खरे तर, ‘मनमर्जियां’तील अभिषेकच्या परफॉर्मन्सवर सर्वात आधी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्रियेची सर्वांना प्रतिक्षा आहे. कारण हा चित्रपट अमिताभ यांनी पाहिलायं. ‘मनमर्जियां’ पाहिल्यानंतर त्यांनी यातील अभिनयासाठी विकी कौशल आणि तापसी पन्नूला शाब्बासकी देणारे स्वलिखित पत्र आणि पुष्पगुच्छही पाठवले. पण अभिषेक बच्चनबद्दल मात्र अद्यापही त्यांनी काहीही बरी-वाईट प्रतिक्रिया दिलेली नाही. खरे तर ‘मनमर्जियां’तील अभिषेकचा फर्स्ट लूक पाहून अमिताभ बच्चन चांगलेच भारावले होते. अभिषेकने आज पूर्वजांची आठवण करून दिली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. पण ‘मनमर्जियां’ पाहिल्यानंतर मात्र ते काहीही बोलले नाहीत.डीएनएने दिलेली बातमी खरी मानाल तर, अमिताभ आणि श्वेता बच्चन यांनी प्रायव्हेट स्क्रिनिंगमध्ये ‘मनमर्जियां’ पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर अभिषेकने पापा अमिताभ यांना प्रतिक्रिया विचारली. पण, नंतर सांगतो, असे म्हणत अमिताभ यांनी काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. दुसऱ्या दिवशी त्यांनी यातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी विकी कौशल आणि तापसी पन्नूची प्रशंसा करणारे पत्र आणि पुष्पगुच्छ पाठवलीत. पण अभिषेकबद्दल अद्याप ते अवाक्षरही बोललेले नाहीत. याचे कारण म्हणजे, अमिताभ लगेच कॅनडातील टोरंटो फिल्म फेस्टिवलसाठी रवाना झालेत. तिथून परतल्यावर ते अभिषेकच्या वापसीवर काय प्रतिक्रिया देतात, ते कळेलच़ स्वत: अभिषेकलाही त्याची प्रतिक्षा असेल.‘मनमर्जियां’ या चित्रपटात अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत. अभिषेकने यात रॉबी नामक शिख युवकाची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :अभिषेक बच्चनअमिताभ बच्चनतापसी पन्नू