Join us  

कोरोनाला हरवून घरी परतल्यानंतर अमिताभ बच्चन यांचा पहिलाच सेल्फी; लाईक्सचा धो-धो पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 2:07 PM

Amitabh Bachchan Selfie : 11 जुलैच्या रात्री अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती.

मुंबईः कोरोनावर मात करून बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन घरी परतले आहेत. ही लढाई जिंकल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांना बिग बींनी एक मस्त सरप्राईज दिलं. हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी आपला सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 12 तासांत तब्बल 7 लाख 86 हजार फॉलोअर्सनी तो लाईक केलाय आणि कमेंट्समधूनही महानायकाला दीर्घायुष्याच्या सदिच्छा दिल्या आहेत.

11 जुलैच्या रात्री अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना लगेचच नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली होती. देशभरातील चाहत्यांसाठी हा धक्काच होता. सगळ्यांनीच सोशल मीडियावरून त्यांना ‘गेट वेल सून’च्या शुभेच्छा दिल्या होत्या. अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही कोरोनाचं निदान झालं. त्यामुळे अमिताभ अधिकच हळवे झाले होते. मात्र, बिग बींनी जिद्दीनं कोरोनाला हरवलं आणि 2 ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या बातमीनं सगळेच चाहते सुखावले.

अमिताभ बच्चन ‘कोरोनामुक्त’, रूग्णालयातून डिस्चार्ज; अभिषेक मात्र रूग्णालयातच

कोरोना अन् ‘कुली’ अपघात... ! अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित हा योगायोग तुमच्या लक्षात आला?

कोरोनावर मात केल्यानंतर काल रात्री पहिल्यांदाच अमिताभ यांचं दर्शन चाहत्यांना घडलं. बिग बींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर घरी परतल्याचा आनंद अगदी स्पष्ट दिसतोय. ‘बहुत कम लोग जानते हैं, की वो बहुत कम जानतें है…’ असा मेसेज या फोटोसोबत आहे.

गेल्या काही दिवसांत अमिताभ बच्चन ट्रोलर्सवर चिडल्याचं पाहायला मिळालं होतं. मोठ्या पडद्यावर 'अँग्री यंग मॅन' साकारणारे बिग बी रिअल लाईफमध्ये शांत, संयमी आहेत. मात्र, ‘बच्चन यांचा कोरोनामुळे मृत्यू व्हावा’, अशी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या फॉलोअरला त्यांनी कडक शब्दांत झापलं होतं. ‘कदाचित तुला तुझे वडील कोण हे ठाऊक नसावे. माझे नऊ कोटी फॉलोअर्स तुझ्यावर तुटून पडतील. समजा मी जर त्यांना सांगितले, ठोक दो साले को, तर तुझी काय गत होईल, याची कल्पना कर’, असं त्यांनी सुनावलं होतं. त्या फॉलोअरची संभावना त्यांनी मारीच, अहिरावण, महिषासुर वगैरे राक्षसांसोबत केली होती.  त्यानंतरही, काही हेटर्सची त्यांनी कानउघाडणी केली होती. एकीकडे, त्यांच्या या आक्रमक पवित्र्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असतानाच, अमिताभ यांनी प्रसन्न फोटो पोस्ट करून सगळ्यांना खूश केलंय.

तो अपने स्वच्छ मुख को स्वच्छ रखिए...! अमिताभ बच्चन पुन्हा भडकले, हेटर्सला झाप झाप झापले...!!

सहने की सीमा होती है...! अन् हेटर्सला अमिताभ बच्चन यांनी दानधर्माची भलीमोठी यादीच दिली 

शांत, संयमी अमिताभ बच्चन यांच्यातला 'टायगर' जागा होतो तेव्हा...

टॅग्स :अमिताभ बच्चनकोरोना वायरस बातम्याइन्स्टाग्राम