Join us  

वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय; प्रचंड ट्रोल झाल्यानंतर अखेर घोषणा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 2:10 PM

Amitabh Bachchan: ७९ व्या वाढदिवशी अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा; करार संपुष्टात, पैसेही परत केले

नवी दिल्ली: बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Birthday) यांचा आज ७९ वा वाढदिवस आहे. कोट्यवधी चाहत्यांकडून, सिनेसृष्टीतून अमिताभ बच्चन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वाढदिवसानिमित्त अमिताभ यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. त्यातून त्यांनी कमला पसंतसोबतचा करार संपुष्टात आणत असल्याची घोषणा केली आहे. 

'पान मसाला ब्रँड कमला पसंद सोबतचा करार संपवला आहे. त्यांच्याकडून घेतलेली फी परत केली आहे', असं अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. कमला पसंदची जाहिरात सरोगेटच्या अंतर्गत येते याची मला कल्पना नव्हती, असंदेखील बिग बींनी ब्लॉगमध्ये नमूद केलं आहे. अमिताभ यांचा सहभाग असलेल्या कमला पसंदची जाहिरात ऑन-एअर होताच अनेकांनी विरोध दर्शवला होता. 

अमिताभ बच्चन यांनी नुकतीच रणवीर सिंहसोबत कमला पसंद पान मसालाची जाहिरात केली. त्यामुळे ते सोशल मीडियार ट्रोल झाले. त्याबद्दल अमिताभ यांनी फेसबुकवर सूचक भाष्य केलं होतं. 'एक घड्याळ खरेदी करून हातावर काय बांधलं, वेळ माझ्या मागेच लागली,' असं अमिताभ यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. बच्चन यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. 'नमस्कार सर, तुम्हा सगळ्यांना कमला पसंदची जाहिरात करण्यामागचं कारण काय? मग इतरांमध्ये आणि तुमच्यामध्ये फरक तो काय?', अशा स्वरुपाचे असंख्य प्रश्न अनेक चाहत्यांनी अमिताभ यांचा विचारले होते.

टॅग्स :अमिताभ बच्चन