Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांनी कोरियोग्राफर रेमो डिसूझासाठी केली प्रार्थना, सोशल मीडियावर व्हायरल होतंय ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 12:14 IST

कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहे.

कोरियोग्राफर आणि  दिग्दर्शक रेमो डिसूझा सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहे. 11 डिसेंबरला रेमोला हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेमोची तब्येत सध्या स्थिर आहे, अशी अपेक्षा आहे की तो लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. .

रेमोच्या लवकर बरं होण्यासाठी  त्याचे चाहते आणि सेलेब्स सतत प्रार्थना करतायेत. रेमोचे खास मित्र टेरेंस लुईस आणि  गीता कपूर  यांनीही इन्स्टाग्रामवर एक  पोस्ट शेअर केली आहे आणि त्याची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर बॉलिवूडचे महानायक बच्चन यांनीही रेमोला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांनी शेअर केलेला व्हिडिओ रिट्वीट केला -" रेमो लवकर ठीक व्हा, प्रार्थना आणि तुमच्या सगळ्यांचा शुभेच्छांसाठी धन्यवाद. हा व्हिडिओ एका डान्स रिअॅलिटी शोचा आहे, ज्यात रेमोने कंटेस्टंटच्या परफॉर्मेंसचे कौतुक केलं आहे.

रेमो हा बॉलिवूडचा दिग्गज कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. दिग्दर्शक अशीही त्याची ओळख आहे. एबीसीडी, एबीसीडी 2, आणि स्ट्रीट डान्सर थ्रीडी या चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले आहे. डान्स इंडिया डान्स, डान्स प्लस आणि झलक दिखला जा यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो जजच्या भूमिकेत दिसला आहे. याच रिअ‍ॅलिटी शोमधल्या स्पर्धकांना घेऊन त्याने ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला आणि त्याचसोबत रिअ‍ॅलिटी शोमधून पुढे आलेले स्पर्धक सेलिब्रिटी म्हणून प्रकाशझोतात आले. 

टॅग्स :अमिताभ बच्चनरेमो डिसुझा