Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमधल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 13:13 IST

शूजित सरकार यांच्या 'गुलाबो सिताबो' सिनेमाचे शूटिंग सध्या सुरु आहे. हा एक कॉमेडी सिनेमा आहे.

शूजित सरकार यांच्या 'गुलाबो सिताबो' सिनेमाचे शूटिंग सध्या सुरु आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असून यात अमिताभ बच्चन महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'पीकू'नंतर दुसऱ्यांदा ते शूजित सरकार यांच्यासोबत काम करतायेत. 'पीकू' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. गुलाबो सिताबोमधील बिग बी यांचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. हा फोटो पाहून अमिताभ बच्चन यांना ओळखणं ही कठीण झाले आहे.  

या लूकमध्ये अमिताभ बच्चन यांची मोठी दाढी, लांब नाक आणि मोठा चष्मा असा अंदाज दिसतोय. अमिताभ बच्चन यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. यात अमिताभ यांच्यासोबत आयुष्मान खुरानासुद्धा दिसणार आहे. हा सिनेमा 24 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची कथा जुही चतुर्वेदीने लिहिली आहे तर रॉनी लहरी आणि शीला कुमार सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगसाठी बिग बी गेले काही दिवस लखनौमध्ये होते  सिनेमात लखनौमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचा वापर करण्यात येणार आहे.    

बिग बी आयुष्मान शिवाय इम्रान हाश्मीसोबत 'चेहरे' सिनेमात दिसणार आहे. 'चेहरे' हा सिनेमा २१ फेब्रुवारी, २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात क्रिती खरबंदा, रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, अन्नू कपूर व रघुवीर यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनआयुषमान खुराणा