Join us

अमिताभ बच्चन यांनाही माहित नाहीय जॉनचे हे गुपित ? काय आहे हे गुपित जाणून घ्या याविषयी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 13:23 IST

कोणत्याही सिनेमातील स्टंट करण्याआधी अभिनेता जॉन अब्राहम सुरक्षेची सगळी खातरजमा करुन घेतो. सुरक्षेसाठी आवश्यक सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का ...

कोणत्याही सिनेमातील स्टंट करण्याआधी अभिनेता जॉन अब्राहम सुरक्षेची सगळी खातरजमा करुन घेतो. सुरक्षेसाठी आवश्यक सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का याची तो माहिती घेत असतो. स्वतःच्याच नाही तर आपल्या सहकलाकारांच्या सुरक्षेचीही त्याला तितकीच काळजी असते. सिनेमातील स्टंट सीन करण्याआधी काळजी घेणारा जॉन प्रत्यक्ष सीन करतानाही तितकाच समर्पित असतो. एखादा स्टंट सीन करण्याआधी कोणतीही सबब देणे त्याला पटत नाही. याचीच प्रचिती जॉन अब्राहमच्या पदार्पणाच्या सिनेमातच आली. ख-या अर्थाने 'ऐतबार' हा जॉनचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात बिग बी अमिताभ यांचीही भूमिका होती. या सिनेमात अनेक स्टंट सीन होते.या सिनेमातील एक स्टंट सीन करण्याआधी जॉनचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यावेळी ''तुझ्या हातापेक्षा डेट महत्त्वाची आहे'' असे त्यावेळी जॉनला सांगण्यात आले होते. या सांगण्याचा जॉननेही आदर केला आणि या स्टंटच्या शुटिंगसाठी जॉन फ्रँक्चर झालेल्या हाताने पोहचला.मात्र कितीही त्रास होत असला, हात दुखत असला तरी तो स्टंट सीन पूर्ण करणे महत्त्वाचे होते असे जॉनला वाटले. त्यामुळे आपला हात दुखावला आहे हे जॉनने सेटवर कुणालाही जाणवू दिले नाही. इतकेच काय तर सेटवर या सिनेमातील सहकलाकार आणि महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनाही जॉनने या दुखापतीची कानोकान माहिती होऊ दिली नाही. कदाचित आजही बच्चनसाहेबांना या दुखापतीबद्दल माहित नसेल असे जॉनने सांगितले. या पहिल्या अनुभवाने आपल्याला बरेच काही शिकवल्याचे जॉनने सांगितले. एखादी दुखापत होण्याआधी ती होऊच नये यासाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे हे सारे एका अनुभवाने शिकवल्याचे जॉनने सांगितले आहे. त्यामुळे पहिल्या सिनेमातील या प्रसंगानंतर जॉन आता स्वतःच्या स्टंटआधी सर्व खबरदारी घेतोच घेतो. शिवाय आपल्या सहकलाकारांच्या सुरक्षेबाबतही तो तितकाच सजग असतो.'फोर्स-टू' सिनेमातील स्टंट करण्याआधीसुद्धा जॉनने आपली सहकलाकार सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता ताहिर यांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष दिले. कारण त्याच्या मते तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा,हिरो बनायचे आहे हिरो बना, नायिका बनायचे आहे नायिका बना, मात्र सगळ्यात आधी तुमची सुरक्षा महत्त्वाची. हेच जॉनचे खरे ब्रीदवाक्य आहे.