Join us

Bachchan ICON! अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीत ५० वर्षे पूर्ण; अभिषेक झाला भावूक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 15:22 IST

अमिताभ बच्‍चन यांना बॉलिवूड इंडस्‍ट्रीत ५० वर्षे पूर्ण झालीत. त्‍यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी बिग बी यांच्‍याविषयी एक छोटी पोस्‍ट लिहिली आहे. श्‍वेता नंदानेही ट्‍विट केले आहे.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती.

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन या नावाचाच स्वत:चा एक दरारा आहे. त्यांचा अभिनय, त्यांची स्टाईल सगळे काही चाहत्यांना भारावून टाकते. म्हणूनचं केवळ भारतात नाही तर जगभर त्यांचे चाहते आहेत. मोठा पडदा असो वा छोटा पडदा किंवा जाहिरातचे विश्व प्रत्येकठिकाणी अमिताभ यांनी छाप सोडलीय. अभिनयाच्या याच ‘शहेनशहा’च्या फिल्मी करिअरला ५० वर्षे पूर्ण झालीत आणि याच निमित्ताने अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली.

अभिषेकने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. तो लिहितो, ‘ते माझ्यासाठी एक आदर्श नाहीत त्यापेक्षाही अधिक आहेत. माझे वडील, एक चांगला मित्र, एक मार्गदर्शक, एक हिरो, माझा टीकाकार आणि माझा सगळ्यात मोठा आधार. आजही कामावरची त्यांची निष्ठा आणि उत्साह तसाच आहे, जसा पहिल्या दिवशी होता. प्रिय बाबा, आज आम्ही तुमचे यश, तुमची प्रतिभा, तुमची निष्ठा, तुमचे व्यक्तिमत्त्व सगळे काही सेलिब्रेट करणार आहोत. येणाºया पुढच्या ५० वर्षांत तुम्ही काय काय कराल, हे बघण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही. आज मी बाबांना त्यांच्या खोलीत जावून शुभेच्छा दिल्यात. तुम्ही कुठे निघालात, असा प्रश्न मी त्यांना केला. त्यांनी उत्तर दिले, कामावर...’.

अमिताभ बच्चन यांनी १९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटापासून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली होती. १९७१ मध्ये सुपरस्टार राजेश खन्नसोबत ‘आनंद’ या चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली. यानंतर आलेले त्यांचे चित्रपट फार कमाल दाखवू शकले नाहीत. पण १९७३ मध्ये ‘जंजीर’  आला आणि अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांची मने जिंकलीत. तेव्हापासून आजतागायत त्यांचा फिल्मी प्रवास अव्याहत सुरु आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन