Join us

आमिरची आई आणि बायको चिंतेत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 17:46 IST

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान कोणतीही भूमिका साकारताना ती परफेक्ट कशी साकारता येईल याचा प्रयत्न करत असतो. आजवर त्यानं साकारलेल्या ...

मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खान कोणतीही भूमिका साकारताना ती परफेक्ट कशी साकारता येईल याचा प्रयत्न करत असतो. आजवर त्यानं साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत त्यानं जीव ओतून काम केलं आहे.मात्र आमिरचं हेच कामावरील प्रेम त्याच्या कुटुंबीयांसाठी खास करुन आई आणि पत्नीसाठी काळजीत टाकणारं ठरतंय. लवकरच आमिरचा दंगल सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय.या सिनेमात आमिर कुस्तीपटूची भूमिका साकारतो. या भूमिकेसाठी त्यानं आपलं वजन वाढवलंय. जवळपास 95 किलोपर्यंत आमिरनं वजन वाढवलंय. त्यामुळं अनेक गोष्टी करताना त्याला त्रास जाणवतो.याच गोष्टीनं आमिरची आई आणि पत्नी सध्या काळजीत पडलेत.. खुद्द आमिरला या गोष्टीचं आता काहीसं टेन्शन आलंय.