Join us  

Lockdown : या अभिनेत्याने स्वत:च कापले स्वत:चे केस, नवा लूक पाहून चाहते क्रेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 3:46 PM

पाहा व्हिडीओ...

ठळक मुद्दे अभिनेता बनण्याआधी तो व्हिजे होता.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोक आपआपल्या घरात बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्याने सगळे काही ठप्प झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. अशात न्हाव्याची दुकाने कुठून उघडी असणार. त्यामुळे अनेकांवर घरातच केस कापण्याची वेळ आली आहे. होय, अगदी सेलिब्रिटींवरही. आता हेच बघा ना, टीव्ही स्टार व बॉलिवूड अभिनेता करण व्ही ग्रोव्हर याने घरीच स्वत: हेअर कट केला.

होय, करण व्ही ग्रोव्हरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तो स्वत: स्वत:चे केस कापताना दिसतोय. करणने फटाफट आपले रेजर काढले आणि कटिंग सुरु केली़ तेही वेगळ्या पद्धतीने.या हेअरकटनंतरचे स्वत:चा नव्या लूकमधील फोटोही त्याने शेअर केला. त्याचा हा नवा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे.

काही दिवसांपूर्वी करणने भांडी घासतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. लॉकडाऊनच्या काळात घरची कामे स्वत: करणे भाग आहे. तेव्हा स्वत:ची कामे स्वत: करा, एकमेकांना मदत करा, असे आवाहन त्याने केले होते.करण व्ही ग्रोव्हर हा टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे.

 अभिनेता बनण्याआधी तो व्हिजे होता. 2004 साली ‘सारथी’ या मालिकेद्वारे डेब्यू केला होता. यानंतर तो अनेक मालिकांमध्ये दिसला. मेरी आवाज को मिल गई रोशनी, वो रहने वाली महलों की, हम आपके है इन-लॉ, तेरी मेरी लव्ह स्टोरीज, लाखों में एक अशा अनेक मालिकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.2016 साली नच बलिए 3 या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला.2015 मध्ये वेडिंग पुलाव या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. स्पॉटलाईट 2 या वेबसीरिजमध्येही तो दिसला.

टॅग्स :बॉलिवूडकोरोना वायरस बातम्या