अहान कोणाला करतोय डेट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 13:12 IST
सुनील शेट्टीचा मुलगा अहान सध्या जोरदार चर्चेत आहे. मुलगी अथियानंतर आता त्याचा मुलगा अहान बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला ...
अहान कोणाला करतोय डेट?
सुनील शेट्टीचा मुलगा अहान सध्या जोरदार चर्चेत आहे. मुलगी अथियानंतर आता त्याचा मुलगा अहान बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी सज्ज झाला आहे. अहान लवकरच फिल्ममेकर साजिद नाडियाडवालाच्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणारेय. आता अहान आॅनस्क्रिन कुणासोबत रोमान्स करणार हे तर अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र त्याचा खासगी आयुष्यातील रोमान्स चर्चा एकवटत आहे. अहान मागील काही वर्षांपासून तानिया श्रॉफला डेट करत असल्याचे समजतेय. २० वर्षीय अहान आणि तानियाची भेट शालेय जीवनात झाली होती. जयदेव श्रॉफ आणि रोमिला यांची मुलगी तानिया आहे. तानियाने अहानसोबतचे बरेच फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोजमध्ये हे दोघे पार्टी, जिमिंग, आउटिंग करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी यांचे ब्रेकअप झाल्याचे देखील बोलले जात होते. दीर्घकाळाच्या रिलेशनशिपनंतर आॅगस्ट २०१५मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले होते. ताज्या रिपोर्ट्सनुसार, आता हे दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. एकीकडे अहान त्याच्या करिअरवर फोकस करतोय, तर दुसरीकडे तानिया तिचे खासगी आयुष्य एन्जॉय करण्यात बिझी आहे. तानियाने तिच्या इन्स्टाग्रामवर बरेच हॉट पिक्चर्स शेअर केले आहेत, यामध्ये ती बिकिनी अवतारात मित्रांसोबत मजा करताना दिसतेय. आता या दोघांचे हे नाते किती काळ टिकतेय हे त्यांनाच माहित. परंतू तानिया आणि अहानची जोडी मात्र झक्कास दिसते यात काही शंकाच नाही.