Join us  

Allu Arjunच्या Pushpa नंतर रिलीजसाठी सज्ज आहे सुकुमारचा 'रंगस्थलम', यातील किसिंग सीन आले होते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 5:50 PM

सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित, अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) स्टारर 'पुष्पा' (Pushpa Movie) चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित, अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) स्टारर 'पुष्पा' (Pushpa Movie) चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने टॉलिवूडला पहिल्या क्रमांकावर आणले आहे आणि साऊथच्या हिंदी डब केलेल्या चित्रपटांना पसंती मिळते. यामुळेच उत्तर भारतातील लोकांची मागणी लक्षात घेऊन निर्मात्यांनी त्यांचे तेलुगू चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता सुकुमार आपला 'रंगस्थलम' (Rangsthalam) हिंदी भाषेतील थिएटरमध्ये प्रदर्शित करणार असल्याचे वृत्त आहे.

उत्तर भारतातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी 'रंगस्थलम'चे निर्माते हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. २०१८ मध्ये, सुकुमार दिग्दर्शित आणि राम चरण - समंथा रुथ प्रभू स्टारर रंगस्थलम हा तेलगू चित्रपट टॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील सुपरहिट चित्रपट होता. आता हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांसाठी फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

रामचरणच्या अभिनयाचे झाले कौतुकरंगस्थलममधील राम चरणच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.ग्रामीण भागातील माणसाची देहबोली, उच्चार शिकून त्याने या भूमिकेवर खूप मेहनत घेतली. या चित्रपटात राम चरण आणि सामंथा यांच्याशिवाय पूजा हेगडे, अनसूया भारद्वाज, जगपती बाबू आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

किसिंग सीनची झाली होती चर्चातसेच या चित्रपटातील एका किसिंग सीनचीही खूप चर्चा झाली होती. त्यावेळी सामंथाचा घटस्फोट झाला नव्हता. त्यामुळे राम चरणसोबत लिप लॉक सीन केल्यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. मात्र या सीनमागे इंटरेस्टेड स्टोरी आहे. याबद्दल सामंथाने सांगितले की, हे चुंबन दृश्य नसून व्हीएफएक्स पराक्रम होता. खरं तर, सुरुवातीला जेव्हा रंगस्थलच्या दिग्दर्शकाने स्टारकास्टला किसिंग सीनची कल्पना दिली तेव्हा दोघांनीही ते करण्यास स्पष्ट नकार दिला आणि ते काढून टाकण्याचा आग्रह धरला. मात्र, सुकुमारने हा सीन शूट करण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार आग्रह केला पण दोघांनीही नकार दिला.

टॅग्स :अल्लू अर्जुनसमांथा अक्कीनेनीरश्मिका मंदानाराम चरण तेजा