Join us

आलियाचा ‘फॅमिली टाईम’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 09:59 IST

आलिया भट्टच्या बॉलीवूडमधील एन्ट्रीने तिला खुप मोठ्या प्रमाणात यश आणि चाहत्यांचे प्रेम मिळवून दिले. सध्या ती तिच्या आयुष्यातील सर्वांत ...

आलिया भट्टच्या बॉलीवूडमधील एन्ट्रीने तिला खुप मोठ्या प्रमाणात यश आणि चाहत्यांचे प्रेम मिळवून दिले. सध्या ती तिच्या आयुष्यातील सर्वांत यशस्वी पॉर्इंटवर उभी आहे. तिचे स्टाईल स्टेटमेंट आणि तिचे कॉमिक अ‍ॅटीट्यूडमुळे तिने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.सध्या ती ‘उडता पंजाब’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून थोडासा वेळ तिने कुटुंबासाठी काढला आहे. ती नुकतीच मल्टीप्लेक्समध्ये तिच्या कुटुंबासोबत दिसली. स्पोर्टिंग स्टायलिश ब्लॅक कॅज्युअल्स मध्ये दिसली.तिची आई आणि बहीण यांची कंपनी ती एन्जॉय करत होती असे दिसले. हा फोटो पाहिल्यावर कळते की, सिम्पल आणि एन्जॉयेबल फॅमिली आऊटींग कशाला म्हणतात ते? याअगोदर ती ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या चित्रपटात दिसली होती.शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपट बॉक्स आॅफीसवर बºयापैकी कमाई करू शकला. आता आलिया ‘उडता पंजाब’ या तगडी स्टारकास्ट, बिग बजेट चित्रपटाकडे आशा लावून बसली आहे.