Join us

आलिया फर्निचरवाला लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एंट्री; आई पूजा बेदीने सांगितले तिचे काही सीक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 19:47 IST

अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया फर्निचरवाला लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. तिच्या एंट्रीबाबत आई पूजा बेदीने तिचे काही सीक्रेट सांगितले आहेत.

तीन लाख २२ हजार फॉलोअर्स आणि कित्येक फॅन पेज असलेली अभिनेत्री पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये डेब्यू न करताच खूप मोठी स्टार बनली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या एका मुलाखतीत पूजा बेदीने म्हटले की, ‘माझी मुलगी मोठ्या पडद्यावर एंट्री करण्यास तयार आहे. तिने न्यू यॉर्क युनिर्व्हसिटीमध्ये एक वर्षाचा दिग्दर्शनाचा कोर्स केला आहे. याव्यतिरिक्त न्यू यॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये तिने एक वर्षाचा अभिनयाचा कोर्सही केला आहे. आता ती भारतात परतली असून, बॉलिवूडमध्ये काम करण्यास सज्ज आहे. सध्या ती अभिनय, कथ्थक, डान्स आणि गायन क्लासेस घेत आहे. याशिवाय तिला प्रचंड आॅफर्सही मिळत आहेत. मात्र मला असे वाटते की, तिने तिच्या तयारीवर लक्ष केंद्रित करायला हवे.’दरम्यान, आलिया तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो नियमित अपलोड करीत असते. तिच्या बºयाच फोटोंना ट्रोलही करण्यात आले आहे. याविषयी पूजाने सांगितले की, ‘भारतात न्यूटिडी आणि बोल्डनेसविषयी लोकांचे खूपच तोकडे विचार आहेत. ही एक खूप मोठी समस्या आहे. अर्थात ही समस्या आमची नसून, लोकांची आहे.’ गेल्यावर्षी आलियाने स्वत:च ट्रोर्लसला जशास तसे उत्तर दिले होते. तिने म्हटले होते की, ‘मी कोणाच्यातरी कॉमेण्टमध्ये वाचले की, ‘ओह, ही बॉलिवूडसाठी नव्हे तर पोर्नसाठी तयार आहे. मला असे वाटले की, मी बिकिनी घातल्यामुळे त्याला असे वाटले असेल. परंतु बिकिनी तर कित्येक मुली घालतात. अशात तुम्ही बॉलिवूड चित्रपट बघत नाहीत काय?, समुद्राच्या किनाºयावर तर कित्येक बिकिनी घातलेल्या मुली तुम्हाला बघावयास मिळतील.’ यावेळी आलियाने ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी एक दमदार ब्लॉगही लिहिला होता. ‘जर माझे क्लीवेज दिसत असतील तर याचा अर्थ असा नाही की, मी तुम्हाला परवानगी देत आहे. याचा साधा आणि सोपा अर्थ हा आहे की, मी तयार होण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या शरीराच्या वाढत्या अवयवांपेक्षाही खूप काही आहे. त्यामुळे लोकांनी उगाचच माझ्याविषयी त्यांचे दूषित मत तयार करू नये.’ दरम्यान, आलियाचा हा बिंधास्त स्वभाव पाहता ती बॉलिवूडमध्ये धमाका करेल यात शंका नाही.