चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बल्गेरियामध्ये आलिया भट्टला झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 13:45 IST
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपला आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच आलियाने आपला 26वा वाढदिवस साजरा केला. ...
चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बल्गेरियामध्ये आलिया भट्टला झाली दुखापत
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या आपला आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच आलियाने आपला 26वा वाढदिवस साजरा केला. ब्रह्मास्त्रच्या शूटिंग दरम्यान आलियाला दुखापत झाली आहे. आलियाच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका अॅक्शनचे शूट करत असताना हा अपघात घडला आहे. त्यामुळे काही काळासाठी आलियाला आता शूटिंग करता येणार नाही. आलिया सध्या बल्गेरियामध्ये शूटिंग करते आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूरसुद्धा आहे. रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करतायेत. रणबीर आणि आलियासह यात मौनी रॉय सुद्धा दिसणार आहे. तिच्यासोबत बल्गेरियामध्ये रणबीर आणि मौनीसुद्धा आहेत. या चित्रपटासाठी रणबीर आणि आलिया अनेक दिवसांपासून मेहनत घेतायेत. दोघांनी यासाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. रणबीरच्या रस्त्यात अडचणी टाकण्याचे काम करणार आहे. ALSO READ : या कारणामुळे आलिया भट्टच्या आईने ठेवले तिचे नावलवकरच आलिया राजी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार करते आहे. यात आलियाचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाºयाशी होतो. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आलिया भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाºयांना देते, असे याचे कथानक आहे. राजीमधून आलिया पहिल्यांदाच आपली आई सोनी राजदानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे. या पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका विक्की कौशल साकारतो आहे. हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन प्रोड्यूस करतो आहे.