आलिया भट्टने पटकावला ट्विटरवर 'हा' किताब
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 11:31 IST
सध्या आलिया भट तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनली आहे. आलियाने आपल्या अभिनय नैपुण्याने आणि ट्रेंडी लुक्सने सोशल नेटिवर्किंग साइट्सवर लोकांचे ...
आलिया भट्टने पटकावला ट्विटरवर 'हा' किताब
सध्या आलिया भट तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनली आहे. आलियाने आपल्या अभिनय नैपुण्याने आणि ट्रेंडी लुक्सने सोशल नेटिवर्किंग साइट्सवर लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे तर ट्विटरवर ती सध्या ‘मोस्ट एंगेजिंग एक्टरेस ऑफ बॉलिवूड’ बनली आहे.स्कोर ट्रेंड्स इंडियाच्यानुसार, आलिया भट 100 गुणांसह ‘मोस्ट एंगेजिंग एक्टरेस ऑन ट्विटर’ ठरली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. नुकतीच, प्रियांका चोप्रा फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी झाल्याने चर्चेचा विषय ठरली होती. स्कोर ट्रेंड्सने दिलेल्या माहितीनुसार, आलिया पहिल्या स्थानी आहे तर 89 गुणांसह सौंदर्यवती अनुष्का शर्मा ट्विटरवर दुस-या स्थानी आहे. दीपिका पादुकोण 76 गुणांसह तिस-या स्थानी आहे. श्रीलंकन ब्युटी आणि रेस-3 गर्ल जॅकलिन फर्नांडीस चौथ्या स्थानी तर आंतरराष्ट्रीय आयकन प्रियांका चोप्रा 63 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.ALSO READ : रणबीर कपूरची ‘फॅन’ झाली आलिया भट्ट, वारंवार ऐकतेय ‘हे’ एकच गाणे!!स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “आलियाची फिल्म राजी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त बिजनेस करून 100 कोटी क्लबमध्ये पोहोचली. आता ती रणबीर कपूर आणि बिग बींच्यासोबत ब्रम्हास्त्र ही फिल्म करत आहे. मल्टिस्टारर कलंक चित्रपटाचाही ती एक महत्वाचा भाग आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीर कपूरच्या लिंक-अप्सच्या बातम्या सर्वत्र आहेत. पब्लिक इवेंटमध्येही ते दोघे ब-याचदा एकत्र दिसतात. ह्या सगळ्यामूळे ट्विटरवर आलियाविषयी जास्त पोस्ट आहेत. आलियाविषयीच्या पोस्टवर सगळ्यात जास्त लाइक, ट्विट-रिट्विट दिसून येतात. त्यामूळे आलिया ट्विटरवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी झाली आहे.“आलियाच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर सध्या आलिया रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' आणि वरुण धवनसोबत कलंक चित्रपटाचे शूटिंग करते आहे जो मल्टीस्टारर चित्रपट आहे. या दोन चित्रपटानंतर आलियाने आणखीन एक चित्रपट साईन केला आहे.