Join us  

आलिया भट-रणबीर कपूरने लग्नानंतर पहिल्यांदा कुटुंबासोबत साजरा केला ख्रिसमस, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 3:57 PM

Alia Bhatt-Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर लग्नानंतर या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये मुलगी राहासोबत पहिला ख्रिसमस साजरा करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये मुलगी राहासोबत पहिला ख्रिसमस साजरा करत आहेत. यावेळी ती कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. अभिनेत्रीची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर यांनी या खास ख्रिसमस सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब दिसत आहे. त्याचबरोबर या ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये मुलगी राहाचा टचही पाहायला मिळाला आहे.

आलिया भटची आई सोनी राजदान हिने ख्रिसमस डिनरचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या दोन्ही मुली आलिया आणि शाहीन भट एकत्र दिसत आहेत. याशिवाय रणबीर कपूर, नीतू कपूर, पूजा भट्ट आणि ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक आणि खास मित्र अयान मुखर्जी देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना दिसले. आपल्या इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सोनी राजदानने चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी, एक व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये आलिया-रणबीर व्यतिरिक्त, त्यांची मुलगी राहाच्या नावाने ख्रिसमस बॉल देखील ख्रिसमसच्या झाडावर लटकताना दिसत आहे.

सोनी राझदान व्यतिरिक्त आलिया भटने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बहीण शाहीनसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "मेरी ख्रिसमस विथ मेरी चेरी". या फोटोच्या पार्श्वभूमीवर घर अत्यंत सजवलेले दिसत होते. याशिवाय आलियाची सासू नीतू कपूरनेही ख्रिसमस डिनरचा सेल्फी घेत चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये आलिया-रणबीरशिवाय शाहीन नीतू कपूर, सोनी राजदान, अयान मुखर्जी आणि शाहीन आणि पूजा भट दिसत होते. अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी चाहते अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्रीला राहाची झलक दाखवण्याची विनंंती करत आहेत. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटनाताळ