काल 28 सप्टेंबरला रणबीर कपूरचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झाला. रणबीरच्या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी ठेवली गेली. पहाटेपर्यंत चाललेल्या या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. रणबीरची लेडी लव्ह आलिया भट आणि आई नीतू कपूर या दोघींनी मिळून ही पार्टी होस्ट केली. यादरम्यान आलियाने रणबीरला एक खास सरप्राईज दिले. या सरप्राईजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, आलियाने रणबीरला स्वत: केलेला केक गिफ्ट दिला. तिने रणबीरचा आवडता पायनॅपल फ्लेवर्ड केक बनवला.
प्यार के लिए कुछ भी...! आलियाने रणबीरला दिले हे खास सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 10:23 IST
आलियाने रणबीरला एक खास सरप्राईज दिले. या सरप्राईजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
प्यार के लिए कुछ भी...! आलियाने रणबीरला दिले हे खास सरप्राईज
ठळक मुद्देवर्कफ्रंट बाबत बोलायचे झाल्यास ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या निमित्ताने रणबीर व आलिया भट्ट पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.