Join us  

‘या’ चित्रपटात जमणार टायगर श्रॉफ- आलिया भट्टची जोडी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 11:27 AM

नव्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफ व आलिया भट्ट लवकरच एकत्र दिसणार आहेत. पण थांबा... कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पुढची बातमी वाचा.

ठळक मुद्दे2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ रिलीज झाला होता. तरूणाईने हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला होता.

नव्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफआलिया भट्ट लवकरच एकत्र दिसणार आहेत. पण थांबा... कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पुढची बातमी वाचा. आलिया व टायगर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील, पण कुण्या चित्रपटात नव्हे तर एका स्पेशल गाण्यात. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटातील एका खास गाण्यात आलिया व टायगर एकत्र दिसणार आहेत. पुढील आठवड्यात दोघेही या गाण्याचे शूट पूर्ण करतील. फराह खान हे गाणे कोरिओग्राफ करणार आहे.

तुम्हाला ठाऊक असेलचं की ‘स्टुडंट ऑफ द ईअर2’ हा ‘स्टुडंट ऑफ द ईअर’चा सीक्वल आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून आलियाचा डेब्यू झाला होता. हा आलियाचा पहिला चित्रपट होता. त्यामुळे तिच्या डेब्यू चित्रपटाचा सीक्वल येतोय म्हटल्यावर आलिया खूश आहेच. पण आता सीक्वलमध्येही कॅमिओ करणार म्हटल्यावर आलियाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. त्याच्यासोबत तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या दोघी या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहेत.  

 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ रिलीज झाला होता. तरूणाईने हा चित्रपट चांगलाच डोक्यावर घेतला होता. हा चित्रपट स्वत: करणने दिग्दर्शित केला होता. पण ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित करतोय. पुनीतने याआधी आय हेट लव्ह स्टोरी आणि गोरी तेरे प्यार में सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

  

टॅग्स :स्टुडंट ऑफ द इअर 2टायगर श्रॉफआलिया भटतारा सुतारियाअनन्या पांडे