Join us  

ठरलं की काय? रणबीर-आलिया जोधपूरला बांधणार लग्नगाठ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 3:18 PM

रणबीर कपूर आणि आलिया पोहोचले जोधपूरला, फोटो व्हायरल

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आलिया लवकरच ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ या सिनेमांत दिसणार आहे. तर रणबीरचा ‘शमशेरा’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे.

लग्नसराई सुरू होतेय आणि चर्चा आहे ती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटच्या (Alia Bhatt) लग्नाची. होय,  आलिया व रणबीरच्या लग्नाची तयारी सुरू झाल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीये. कारणही तसंच आहे. हे लव्हबर्ड्स अलीकडे जोधपूरमध्ये एकत्र दिसले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि त्यानिमित्तानं नवी चर्चाही सुरू झाली. आलिया व रणबीर डेस्टिनेशन वेडिंगचं ठिकाण पाहण्यासाठी जयपूरला गेल्याची चर्चा रंगली.रणबीर व आलिया अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांचं नातं कुणापासूनही लपून राहिलेलं नाही. हे कपल रविवारी जोधपूरमध्ये दिसलं.   (Alia Bhatt And Ranbir Kapoor Spotted In Jodhpur )

दोघे जयपूरला नेमके कशासाठी गेले होते, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण जोधपूरचं नाव ऐकल्यावर एकच अंदाज बांधला गेला. तो म्हणजे, डेस्टिनेशन वेडिंगचा. डेस्टिनेशन वेडिंगसाठी जोधपूर हे  सेलिब्रिटींचं आवडत ठिकाण आहे. त्यामुळेच आलिया आणि रणबीर देखील जोधूपरमध्ये वेडिंग डेस्टिनेशन पाहण्यासाठी गेले असावेत अशी चर्चा सुरू झाली.

 उद्या 28 सप्टेंबर रोजी रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी  ते जोधपूरला गेले असावेत, असंही म्हटलं जातंय.   सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रणबीरने ब्राऊन रंगाचा सैलसर टी शर्ट आणि ट्राऊझ घातले होते. तर आलियाने ग्रीन व्हाईट रंगाचे प्रिन्टेट जॅकेट आणि जीन्स घातली होती.   वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर आलिया लवकरच ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ या सिनेमांत दिसणार आहे. तर रणबीरचा ‘शमशेरा’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. याशिवाय आलिया आणि रणबीर यांनी एकत्र काम केलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर