Join us

आलिया भट व माधुरी दीक्षित यांच्यात रंगणार जुगलबंदी या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 16:06 IST

आलिया भट 'ब्रह्मास्त्र'चे चित्रीकरण पार पडल्यानंतर कलंक सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार आहे.

ठळक मुद्देआलिया भटने घेतले कथ्थकचे प्रशिक्षणमाधुरी दीक्षित व आलिया भट एकत्र थिरकणार कलंकमध्ये

बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भटने 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातून तिने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली. त्यानंतर तिने विविध भूमिकांतून प्रेक्षकांना आपलेसे केले. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'राझी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यातील आलियाचे काम प्रेक्षकांना खूप भावले. आता ती धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'कलंक' सिनेमात दिसणार आहे. तिने या सिनेमाचे थोडेफार चित्रीकरण केले असून उर्वरित चित्रीकरण लवकरच करणार आहे. सध्या ती 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगसाठी बुल्गारियामध्ये करत आहेत. 

आलिया 'ब्रह्मास्त्र'चे चित्रीकरण पार पडल्यानंतर कलंक सिनेमाचे चित्रीकरण सुरू करणार आहे. हा एक पीरियड ड्रामावर आधारीत चित्रपट असून यात आलिया नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी ती कथ्थकचे प्रशिक्षण देखील घेते आहे. ती लवकरच माधुरी दीक्षितसोबत एका गाण्याचे चित्रीकरण करणार आहे. त्यात ती कथ्थक करताना दिसणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माधुरी व आलिया या दोघी एकत्र डान्स करताना दिसणार आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या तयारीसाठी संपूर्ण टीम तयार झाली आहे. हे क्लासिकल गाणे असणार असून यात जुन्या काळातील झलक पाहायला मिळणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट गेल्या एक वर्षापासून कथ्थक डान्सचे प्रशिक्षण घेते आहे. मात्र या गाण्यात तिचा सामना माधुरी दीक्षितसोबत होणार आहे. जी नृत्यात निपुण आहे. आलियाने एक वर्षापासून कथ्थकचे प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली असून गेल्या एक दीड महिन्यापासून ती जास्त मेहनत घेत होती. आलिया भट व माधुरी दीक्षितला एकत्र नृत्य करताना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

टॅग्स :कलंकआलिया भटमाधुरी दिक्षित