Join us  

अली फजलची सटकली; म्हणे, आधी माझे पैसे द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 2:45 PM

अभिनेता अली फजल सध्या जाम संतापला आहे. होय, अलीच्या ‘तडका’ या चित्रपटाचे प्रमोशन सॉन्ग रिलीज झाले आणि अली संतापला.

ठळक मुद्देअलीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या तो नेटफ्लिक्सच्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमध्ये बिझी आहे.

अभिनेता अली फजल सध्या जाम संतापला आहे. होय, अलीच्या ‘तडका’ या चित्रपटाचे प्रमोशन सॉन्ग रिलीज झाले आणि अली संतापला. ‘खींच ले कश...’, असे या गाण्याचे बोल आहेत. खरे तर आगामी चित्रपटाचे प्रमोशन सॉन्ग रिलीज झाले म्हटल्यावर अलीने खूश व्हायला हवे. पण तो भडकला. याचे कारण म्हणजे, अद्याप अलीला पैसे मिळालेले नाहीत.होय, अद्याप मला पेमेंट मिळालेला नाही. असे असताना चित्रपटाचे गाणे कसे काय रिलीज होऊ शकते? असा प्रश्न त्याला पडला.

 

ट्विटरवर त्याने याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. ‘तडकाच्या निर्मात्यांनी अद्याप कलाकारांना त्यांच्या मानधनाची रक्कम दिलेली नाही अन् प्रमोशनल सॉन्ग रिलीज केले. हे नैतिकचे उल्लंघन आहे. मला आठवते, त्याप्रमाणे या चित्रपटाच्या निर्मात्यांवर कोर्टात केस सुरु आहे. कारण चेक बाऊन्स झालेत. कलाकार व क्रू मेंबर्सचे पेमेन्ट थकीत आहेत. प्रमोशनल सॉन्ग रिलीज झालेले पाहून मला धक्का बसला,’ असे अलीने लिहिले आहे.

‘खींच ले कश...’ हे गाणे यु ट्यूबवर अपलोड करण्यात आले आहे. तापसी पन्नूवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. गाण्याचे बोल कुमारचे असून शिवीने हे गाणे गायले आहे.या चित्रपटात तापसी आणि अली फजल लीड रोलमध्ये आहेत. 

अलीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या तो नेटफ्लिक्सच्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमध्ये बिझी आहे. याशिवाय संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटातही तो दिसणार आहे.अलीने ‘द अदर एंड द लाइन’ या इंग्रजी चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. 2009 मध्ये ‘3 इडियट्स’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याला खरी ओळख मिळाली ती 2013 मध्ये आलेल्या ‘फुकरे’ या चित्रपटाने.

टॅग्स :अली फजल