Join us  

अलाया एफ झळकणार या चित्रपटात, शूटिंगला केली सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 3:53 PM

अलाया एफने नुकतेच 'यू टर्न' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

सैफ अली खान आणि तब्बू यांच्यासोबत 'जवानी जानेमन' चित्रपटातून अलाया एफने केवळ अभिनेत्रीच्या रूपात आपली योग्यता सिद्ध केली असे नाही तर सर्वांची मने देखील जिंकली आहेत. आणि यात काहीच आश्चर्य नाही की या युवा सेंसेशनचे, जिचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही सारखेच कौतुक केले. तिच्याकडे आगामी महत्त्वाचे ३ चित्रपट आहेत. अलायाकडे असणाऱ्या बऱ्याच प्रोजेक्टमुळे ती मागील काही महिन्यांपासून खूप व्यग्र आहे. ती वर्क कमिटमेंट्ससोबत २४ तास चित्रीकरणात व्यस्त आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार,अलाया एफने चंदिगढमध्ये 'यू टर्न'चे जवळपास ४५ दिवसांचे चित्रीकरण शेड्यूल नुकतेच पूर्ण केले असून, मुंबईत येऊन लगेचच 'फ्रेडी'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यासोबतच, ही अभिनेत्री अनुराग बसु यांच्या आगामी चित्रपटात देखील काम करत असून त्याबद्दलची अधिक माहिती अजून गुलदस्त्यात आहे. 

अलाया एकाच वेळी इतक्या प्रोजेक्ट्सवर काम करत असून देखील, आपल्या आधी केलेल्या ब्रॅंड कॅम्पेनच्या कमिटमेंट्ससाठी देखील आपल्या व्यस्त दिनाक्रमातून वेळ काढत असल्याचेदेखील सूत्रांनी पुढे सांगितले.

अलायाकडे ३ महत्त्वाचे चित्रपट असून ती सध्या कार्तिक आर्यनसोबत, एकता कपूरच्या 'फ्रेडी'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. बालाजी टेलीफिल्म्सद्वारे निर्मित 'यू टर्न' नामक आगामी चित्रपट तसेच, अनुराग बसु यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटात देखील ती असणार आहे.

टॅग्स :अलाया फर्निचरवाला