Join us  

बॉक्सऑफिसवर ‘केसरी’ची सरशी! पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 1:59 PM

‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्या दिवशी ‘केसरी’ने देशात २१. ५० कोटींची कमाई केली.

ठळक मुद्देगुरुवारी रिलीज झालेल्या ‘केसरी’ला चार दिवसांचा वीकेंड मिळणार आहे. समीक्षकांची दाद आणि प्रेक्षकांची माऊथ पब्लिसिटी या जोरावर ‘केसरी’कडून बक्कळ कमाईची अपेक्षा केली जात आहे.

‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारचाकेसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्या दिवशी ‘केसरी’ने देशात २१. ५० कोटींची कमाई केली. ही कमाई यासाठीही उल्लेखनीय आहे कारण, काल होळीच्या दिवशी सकाळी ‘केसरी’चे फार कमी शो होते. बहुतांश शो संध्याकाळचे होते. पण याऊपरही ‘केसरी’ने बाजी मारली आणि हा चित्रपट अक्षय कुमारच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला. ( गतवर्षी रिलीज झालेल्या अक्षयच्या ‘गोल्ड’ने पहिल्या दिवशी २५.२५ कोटी कमाई केली होती. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता.)

याशिवाय यंदाच्या ‘बिगेस्ट ओपनर’ चित्रपटांच्या यादीतही ‘केसरी’ने अव्वल स्थान मिळवले आहे. गली बॉय, टोटल धमाल, कॅप्टन मार्वल या सगळ्या चित्रपटांना धूळ चारत ‘केसरी’ बिगेस्ट ओपनर सिनेमा ठरला. तुम्हाला ठाऊक असेलच की, गली बॉयने पहिल्या दिवशी १९.४० कोटींची कमाई केली होती. टोटल धमालने पहिल्या दिवशी १६.५० कोटी आणि कॅप्टन मार्वलने १३.०१ कोटी कमावले होते.गुरुवारी रिलीज झालेल्या ‘केसरी’ला चार दिवसांचा वीकेंड मिळणार आहे. समीक्षकांची दाद आणि प्रेक्षकांची माऊथ पब्लिसिटी या जोरावर ‘केसरी’कडून बक्कळ कमाईची अपेक्षा केली जात आहे. कदाचित पहिल्याच वीकेंडमध्ये हा चित्रपट १०० कोटींची कमाई करेल, असे मानले जात आहे. ‘केसरी’ची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली आहे तर अनुराग सिंहने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सारागढीच्या ऐतिहासिक युद्धावर आधारित या चित्रपटात अक्षय कुमार व परिणीती चोप्रा लीड रोलमध्ये आहेत.

टॅग्स :केसरीअक्षय कुमार