Join us  

अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’मध्ये काम करणा-या अभिनेत्यावर आली भाजीपाला विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 12:19 PM

अनेक सेलिब्रिटींचा बॉडीगार्ड राहिलेल्या कार्तिकने अक्षय कुमारसोबत कामही केले. पण आज याच कार्तिकवर भाजीपाला विकण्याची वेळ आलीय.

ठळक मुद्देस्थिती पूर्वपदावर आली की इंडस्ट्रीत परतून कमबॅक करण्याचा त्याचा इरादा मात्र कायम आहे. तूर्तास मात्र भाजीपाला विकणे हाच एक  पर्याय त्याच्याजवळ आहे.

कोरोना व्हायरसने सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सर्वांचेच जीवन विस्कळीत केले आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांचे आयुष्य बदललेय. काही कलाकार तर आपल्या गरजाही पूर्ण करू शकत नसल्याचे चित्र आहे. असाच एक कलाकार म्हणजे कार्तिक साहू. ओडिशाचा कार्तिक साहू इंडस्ट्रीत नॉन फंक्शनल आणि प्र्रॉडक्शनमध्ये काम करतो. अनेक सेलिब्रिटींचा बॉडीगार्ड राहिलेल्या कार्तिकने अक्षय कुमारसोबत कामही केले. पण आज याच कार्तिकवर भाजीपाला विकण्याची वेळ आलीय.

ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्याचा कार्तिक आपले नशीब आजमावण्यासाठी मायानगरीत आला होता. केवळ वयाच्या 17 व्या वर्षी तो मायानगरीत आला. यानंतरची अनेक वर्षे बॉलिवूड स्टार्सचा बॉडीगार्ड म्हणून त्याने काम केले. अमिताभ बच्चनपासून तर सचिन तेंडूलकरपर्यंत मोठ मोठ्या सेलिब्रिटींचा बॉडीगार्ड राहिला. अचानक नशीबाने कलाटणी घेतली आणि त्याला अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या सिनेमात त्याला संधी मिळाली. हा सिनेमा अद्याप रिलीज व्हायचा आहे. या सिनेमात कार्तिक अक्षय कुमारसोबत फायटींग सीन करताना दिसणार आहे. मात्र सध्या कार्तिक भाजीपाला विकतोय.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कार्तिक आपल्या घरी परतला. या काळात त्याच्याजवळचे होते नव्हते तेवढे सगळे पैसे संपले. गेल्या चार महिन्यांत त्याच्या हाताला काम नव्हते. अशात त्याने भुवनेश्वर गाठले. पण येथेही त्याला कुठलेही काम मिळाले नाही. अखेर कार्तिकने भाजीपाल्याचा ठेला सुरु केला. सध्या याच मिळतीतून तो स्वत:चे व कुटुंबाचे पोट भरतोय.स्थिती पूर्वपदावर आली की इंडस्ट्रीत परतून कमबॅक करण्याचा त्याचा इरादा मात्र कायम आहे. तूर्तास मात्र भाजीपाला विकणे हाच एक  पर्याय त्याच्याजवळ आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारकोरोना वायरस बातम्या