Join us  

केसरी या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकवर ही होती त्याच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 11:05 AM

केसरी या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात अक्षय एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षयला त्याच्या केसरी या चित्रपटातील लूक खूपच आवडला असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले.

ठळक मुद्देअक्षयचा हा लूक पाहून त्याच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती असे विचारले असता अक्षय सांगतो, मी पंजाबी असल्याने मला या लूकमध्ये पाहून माझी आई खूपच खूश झाली होती.

आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारची गणना केली जाते. त्याचा केसरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात अक्षय एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षयला त्याच्या केसरी या चित्रपटातील लूक खूपच आवडला असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान सांगितले. 

केसरी या चित्रपटाच्या लूकबाबत अक्षय सांगतो, या चित्रपटातील माझा लूक खूपच वेगळा आहे. या चित्रपटात मी पगडी घातलेली आहे. एकदा तुम्ही पगडी डोक्यावर घातल्यानंतर तुमच्यावर एक प्रकारची जबाबदारी येते. तुमचा कणा ताठ होतो, मान उंचावते, नजर स्थिर होते, ती एक वेगळीच भावना असते असे मला वाटते. चित्रपटात मी घातलेली पगडी ही दीड किलोची होती. ती घालून लढाई करणे, तलवार उचलणे हे सोपे नव्हते आणि त्यात खूप ऊन असायचे. चित्रीकरण करताना धूळ डोळ्यांत जायची या सगळ्यात चित्रीकरण करणे हे एक आव्हान होते. 

 

अक्षयचा हा लूक पाहून त्याच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती असे विचारले असता अक्षय सांगतो, मी पंजाबी असल्याने मला या लूकमध्ये पाहून माझी आई खूपच खूश झाली होती. तिच्यासाठी ती एक अभिमानास्पद गोष्ट होती तर या लूकमध्ये मी माझी मुलगी निताराच्या समोर आल्यानंतर काही क्षण तिने मला ओळखलेच नव्हते. ती केवळ टक लावून माझ्याकडे पाहात होती. माझ्या या लूकला माझ्या कुटुंबियांनी दिलेली पसंती माझ्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. 

'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार आणि करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अक्षय कुमार सोबतच या चित्रपटात परिणीती चोप्रा, मीर सरवर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

टॅग्स :अक्षय कुमारकेसरी