Join us  

‘आयर्न मॅन’ जेव्हा ‘पॅडमॅन’ची कॉपी करतो...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 4:00 PM

अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेमने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. अशात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने काय करावे? तर त्याने चक्क ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’मध्ये आयर्न मॅनची भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनीची ‘कॉपी’ पकडली.

ठळक मुद्देअक्षय लवकरच करिना कपूरसोबत ‘गुड न्यूज’ या सिनेमात दिसणार आहे.

अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेमने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. अशात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने काय करावे? तर त्याने चक्क ‘अ‍ॅव्हेंजर्स- एंडगेम’मध्ये आयर्न मॅनची भूमिका साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनीची ‘कॉपी’ पकडली. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.होय, अक्षयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या व्हिडिओत रॉबर्ट डाऊनीने चक्क अक्षयसारखी टाय घातली आहे.  एवेंजर्स एंडगेममध्ये आयर्न मॅनची व्यक्तिरेखा साकारणारा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनीनेही त्याच्यासारखीच टाय घातली आहे, असे अक्षयने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

सर्वप्रथम रॉबर्ट डाउनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपला सूटाबुटातला फोटो शेअर केला. यात तो सूट आणि टाय घालून उभा असलेला दिसत आहे. अक्षयने हा फोटो पाहिला तेव्हा आपल्याकडेही अगदी तशीच टाय असल्याचे त्याला कळले.  मग काय त्यानेही रॉबर्ट डाउनीनेही त्याच्यासारखीच टाय घातली, हे दाखवण्याचा मोह त्याला आवरता आला नाही.  ‘जेव्हा आयर्न मॅनही तुमच्यासारखी टाय घालतात. कोणावर ही टाय चांगली दिसते?’ असे अक्षयने लिहिले. अक्षयच्या या पोस्टवर नेटीजन्सनी एकामागोमाग एक कमेन्ट द्यायला सुरुवात केली.  ‘पॅडमॅन आणि आयर्न मॅन एकत्र..’ अशी कमेंट एका युजरने दिली.  

अक्षयच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास  लवकरच तो करिना कपूरसोबत ‘गुड न्यूज’ या सिनेमात दिसणार आहे. यापूर्वी २००९ मध्ये प्रदर्शित ‘कमबख्त इश्क’मध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. याशिवाय ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे शूटींग अक्षयने सुरु केले आहे. हा चित्रपट ‘कंचना 2’ या साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे.

टॅग्स :अक्षय कुमारअ‍ॅवेंजर्स- एंडगेम