Join us  

डोक्यावर टोपी अन् तोंडावर मास्क, मेट्रोतून प्रवास करताना दिसला अक्षय कुमार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 8:53 AM

Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार(Akshay Kumar)चा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबई मेट्रो(Metro)मध्ये प्रवास करताना दिसत आहे. शेजारी इतर लोक उभे होते, पण त्याला कोणी ओळखू शकले नाही. अक्षयसोबत निर्माता दिनेश विजानही ​​दिसला होता. अक्षय कुमारमेट्रोत फिरतोय याची कोणालाच कल्पना नव्हती. पण एका चाहत्याने त्याला ओळखले आणि गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ समोर येताच चाहते क्रेझी झाले आहेत.

यावेळी अक्षय कुमारने तोंडावर मास्क आणि डोक्यावर टोपी घातली होती. त्यामुळे त्याची ओळख पटली नाही. अक्षय कुमारचा हा साधेपणा पाहून चाहते प्रभावित झाले. अक्षयचा हा व्हिडिओ एक्सवरील फॅन पेजने शेअर केला आहे. मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी अक्षय मुंबई मेट्रोने प्रवास करत होता आणि त्याचा अंदाज पाहून चाहते थक्क झाले होते.

दुसऱ्यांदा अक्षयने केला मेट्रोनं प्रवासअक्षयची मेट्रोमध्ये बसण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. २०२३ मध्येही तो अशाच पद्धतीने मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसला होता. मात्र, त्यावेळी तो त्याच्या 'सेल्फी' चित्रपटाचे प्रमोशन करत असताना इतर प्रवाशांशी बोलतानाही दिसला होता.

आगामी प्रोजेक्ट्सहा व्हिडीओ समोर आल्यानंतर अक्षय कुमार भविष्यात निर्माता दिनेश विजान यांच्या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटांवर नजर टाकली तर त्यात 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'वेलकम ३' सारख्या चित्रपटांची नावे आहेत.

टॅग्स :अक्षय कुमारमेट्रो