अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत आनंदी आहे. फॅमिली मॅन आहे. पण एकेकाळी लव्हर बॉय अशीच त्याची इमेज होती. लग्नाआधी अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. शिल्पा शेट्टी, रवीना टंडन या दोघींबद्दल तुम्हाला ठाऊक असेलच. पण त्याच्या गर्लफ्रेन्डच्या यादीत याशिवायही अनेक नावे होती. पूजा बत्रा, आयशा जुल्का, प्रियंका चोप्रा, रेखा अशा अनेकींसोबत अक्षयच्या अफेअरच्या चर्चा गाजल्या. यापैकी एकीहीसोबत अक्षयचे नाते पुढे गेले नाही. पण हो यापैकी सर्वांना अक्षयने लग्नाची वचने मात्र दिलीत. होय, अक्षय त्याच्या प्रत्येक गर्लफ्रेन्डला मंदिरात घेऊन जायचा. शिल्पा शेट्टीने याबाबत खुलासा केला होता.
एका मुलाखतीत शिल्पा शेट्टीने अक्षयसोबतचे आपले संबंध उघड केले होते. अक्षय कुमार शिल्पासोबत रिलेशनशिपमध्ये होताच पण याचवेळी तो ट्विंकललाही डेट करत होता. म्हणजेच एकाचवेळी दोघींसोबत नात्यात होता.
आपल्या गर्लफ्रेन्डचा विश्वास जिंकण्यासाठी तो नेहमी एकच गोष्ट करायचा. तो म्हणजे तिला मंदिरात घेऊन जायचा. शिल्पाने मुलाखतीत सांगितल्यानुसार, अक्षय कुमार त्याच्या प्रत्येक मैत्रिणीचा विश्वास जिंकायचा. यासाठी तो तिला रात्री उशीरा सिद्धिविनायक मंदिरात न्यायचा आणि तिला लग्न करण्याचे वचन द्यायचा. पण हे तेवढ्यापुरते. आयुष्यात नवी मुलगी आली की, तो सगळ्या आणाभाका विसरायचा.
शिल्पा आणि अक्षयची पहिली भेट 1994 मध्ये ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’च्या सेटवर झाली. 1997 मध्ये ‘जानवर’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली.