Join us  

पाहा अक्षय कुमारच्या आईचा फोटो, त्यानेच शेअर केला सोशल मीडियावर तिच्यासोबतचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 6:02 PM

अक्षयने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत आपल्याला त्याच्या आईला पाहायला मिळत आहे. 

ठळक मुद्देअक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो त्याची आई अरुणा भाटिया यांच्यासोबत लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याची आई व्हिलचेअरवर बसलेली असून त्याने या व्हिडिओसोबत एक खास संदेश त्याच्या चाहत्यांसाठी देखील लिहिला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. चित्रपटाच्या प्रमोशनाव्यतिरिक्त अक्षय विविध सामाजिक मुद्देदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतो. अक्षयने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत आपल्याला त्याच्या आईला पाहायला मिळत आहे. 

अक्षय हा खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच तो एक खूप चांगला व्यक्ती देखील आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर तो नेहमीच आवाज उठवत असतो. अक्षय त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी तो नेहमीच त्याच्या कुटुंबियांना वेळ देतो. त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर अनेकवेळा आपल्याला त्याच्या कुटुंबियातील मंडळींचे फोटो पाहायला मिळतात. सध्या त्याने त्याच्या कामातून ब्रेक घेतला असून तो त्याच्या आईसोबत वेळ घालवत आहे. त्याच्या आईच्या गुडघ्यांचे नुकतेच ऑपरेशन झाले असून त्यांची तब्येत आता सुधारत आहे.

अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो त्याची आई अरुणा भाटिया यांच्यासोबत लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याची आई व्हिलचेअरवर बसलेली असून त्याने या व्हिडिओसोबत एक खास संदेश त्याच्या चाहत्यांसाठी देखील लिहिला आहे. त्याने लिहिले आहे की, चित्रीकरणातून वेळ काढून सध्या आईसोबत काही वेळ घालवत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही व्यग्र असला तसेच तुम्ही कितीही प्रगती करत असाल... तुमच्या पालकांचे देखील वय होत असते. त्यामुळे तुम्हाला जमेल तितका वेळ त्यांच्यासोबत नक्कीच घालवा...

अक्षयने काही दिवसांपूर्वी देखील त्याच्या आईचा एक फोटो शेअर केला होता. त्यात त्याची आई आपल्याला योगा करताना दिसत होती. त्याने त्यासोबत लिहिले होते की, सर्जरी झाल्यानंतरही वयाच्या 75 व्या वर्षी माझी आई योगा करत असून हा तिच्या नित्यनियमाचा भाग आहे. मला तिच्याबद्दल प्रचंड अभिमान वाटतो. 

अक्षयचा मिशन मंगल हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत असून या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाचे देखील कौतुक होत आहे. हा चित्रपट आता महाराष्ट्रात करमुक्त देखील केला आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारमिशन मंगल