पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी अक्षयकुमारने शेअर केला फॅमिली फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 18:58 IST
बॉलिवूडचा ‘मिस्टर खिलाडी’ अक्षयकुमारला आज राष्टÑपती भवन येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याच्या ७ तारखेला अक्षयकुमारला हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता.
पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी अक्षयकुमारने शेअर केला फॅमिली फोटो!!
बॉलिवूडचा ‘मिस्टर खिलाडी’ अक्षयकुमारला आज राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याच्या ७ तारखेला अक्षयकुमारला हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता. त्यानंतर बराचसा वादही निर्माण झाला होता. अक्षयला हा पुरस्कार त्याच्या ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी देण्यात आला असून, पुरस्कार स्वीकारण्याअगोदर त्याने पत्नी ट्ंिवकल आणि मुलगा आरव यांच्यासोबतचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर अक्षयकुमारला हा पहिला-वहिला पुरस्कार मिळत आहे. त्यामुळे आजचा दिवस त्याच्याकरिता खूपच स्पेशल आहे. हा दिवस आणखी स्पेशल करण्यासाठी त्याने पुरस्कार स्वीकारण्याअगोदर पत्नी आणि मुलाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये अक्षयने काळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे. तर पत्नी ट्ंिवकलने एक सुंदर साडी घातलेली आहे. मुलगा कुर्ता आणि पैजामामध्ये दिसत आहे. {{{{facebook_video_id####https://www.facebook.com/akshaykumarofficial/videos/10154903087418283/">या फोटोला कॅप्शन देताना अक्षयने लिहिले की, ‘माझ्या आयुष्यातील खूपच स्पेशल दिवस माझ्या आयुष्यातील स्पेशल लोकांसोबत’. अक्षयचा हा फोटो त्याच्या फॅन्सकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. कारण अक्षयचे फॅन्स हा फोटो लाइक्स करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात शेअरही करीत आहेत. हा संदेश स्वीकारण्याअगोदर अक्षयने एका व्हिडीओच्या माध्यमातून तरुणांना एक संदेशही दिला आहे. आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करताना अक्षयने म्हटले की, ‘जे काही बोलणार ते मनापासून बोलणार, थेट बोलणार. आज माझा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे, जो मला आदरणीय राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की, मी किती आनंदी आहे’. अक्षयचा हा व्हिडीओ सध्या नेटिझन्समध्ये चांगलाच पसंंत केला जात आहे. अक्षयला हा पुरस्कार त्याच्या १२ आॅगस्ट २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.