Join us

"तो पुढे आला अन् माझ्या हातावर रक्त.."; अक्षयने सांगितला चाहत्याचा भयावह अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 11:46 IST

अक्षय कुमारने नुकत्याच एका मुलाखतीत त्याला आलेला चाहत्याचा भयावह अनुभव सर्वांना सांगितलाय

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी 'बडे मिया छोटे मिया' सिनेमाची उत्सुकता आहे. अक्षय - टायगर या सिनेमातून पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. दोघेही अॅक्शन स्टार असल्याने प्रेक्षकांना सिनेमात तगडी मारधाड पाहायला मिळणार यात काही शंका नाही. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने अक्षय रणवीर अल्लाहबादिया या प्रसिद्ध पॉडकास्टरसोबत गप्पा मारायला गेला होता. त्यावेळी अक्षयने त्याच्या एका चाहत्याचा भयावह अनुभव सांगितला. 

अक्षय म्हणाला, “एकदा काय झालं मी बऱ्याच लोकांशी हात मिळवत होतो आणि अचानक मला माझ्या हातातून रक्त येत असल्याचं दिसलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की  एका फॅनने त्याच्या नखांमध्ये ब्लेड अडकवलं होतं. म्हणून जेव्हा मी सर्वांशी हात मिळवत होतो, तेव्हा त्याने संधीचा वापर केला अन् ब्लेड असलेल्या नखांनीच मला हात मिळवला. त्यामुळे माझा हात कापून रक्त आलं.” 

अक्षय कुमार आगमी 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. वासू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे सिनेमाचे निर्माते आहेत.  येत्या 11 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारटायगर श्रॉफ